आयुष्य हे एकच आहे!
आयुष्य हे एकच आहे!
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
बिनसल तरी?
काही तरी बोला!
कारण आयुष्य हे एकच आहे!
दुश्मनी असली तरी?
एकदा तरी हसा!
कारण आयुष्य हे एकच आहे!
साहेबांशी बिनसलय?
तरी राग आवरा!
कारण आयुष्य हे एकच आहे!
व्यापारात तोटा ज़ालय?
तरी माघार घेवू नका.
कारण आयुष्य हे एकच आहे!
वडिलांशी तडकाफडकी ज़ालीय?
तरी वडिलांचे पाय धरा!
कारण आयुष्य हे एकच आहे!
आईशी रुसलाय काय?
तरी तिच्या कुशीत जा!
कारण आयुष्य हे एकच आहे!
पत्नीशी वाजालय?
तरी तिच्याकडे प्रेमाने बघा!
कारण आयुष्य हे एकच आहे!
पतीशी वाजालय?
तरी त्याच्या कडे प्रेमाने बघा!
कारण आयुष्य हे एकच आहे!
मुलाबाळांशी पटत नाहि?
त्यांना एकदा कवटाळा!
कारण आयुष्य हे एकच आहे!
मित्राशी जुळत नाही?
एकदा तरी त्याला खुशाली विचारा!
कारण आयुष्य हे एक आणि एकच आहे!!