आठवण
आठवण
1 min
272
बरसणाऱ्या सरी सखे फक्त तुझीच आठवण करून देतात,
मग एकटाच असलो जरी मी,
मला तुझ्या आठवणीच्या बाहुपाशात घेतात,
मंद वाहतो वारा अशावेळी आणि
तुझ्याच विचारांचं काहूर मनात साठतं,
अन् बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सोबतीला
माझ्या डोळ्यातलं आभाळ दाटतं...
