STORYMIRROR

Dashrath Kamble

Others

3  

Dashrath Kamble

Others

आत्मचिंतन

आत्मचिंतन

1 min
471

विचार कर जरा मानवा

कोण वसे तुझ्या अंतरी,

आत्माराम हा त्रिलोकनाथ

वास करी निरंकारी.


धंदा याचा सांगकाम्या

मुक्काम याचा असे कोठेही,

पहा याला दाही दिशात

दिसतो हा सर्व ठायी.


हा विश्वनाथ

असे तो सर्वव्यापी,

वय याचे असे अनाडी

हाच जीवनाचा मुख्य अभियंता कार्यकारी.


याच्या हाती सर्व आहे

जगाचे निर्माण व्यवस्थापण,

विध्वंस ही हाच करीतो

जाणून घ्यावे याला आपण.


मुक्काम पोस्ट याचा

आहे त्रिलोकनगर,

राहणार जिल्हा ब्रम्हांड याचा

गाव असे ते निर्गुणनगर.


साहित्याला गुण द्या
लॉग इन