आपत्ती एक चंगळ
आपत्ती एक चंगळ
1 min
229
अवर्षण झाले
मदत निधीचे वाटप केले
गुरानां चारा छावण्याचे निर्माण झाले
चारा, शेणाच्या पैशाने ओंजळ भरली
खरेच आपत्ती एक चंगळ ठरली....
अतिवृष्टी झाली
अनेकांच्या प्रपंच्याची वाताहत झाली
मदत निधीसाठी घोषणा झाली
यादीत नाव घालण्यासाठी पैशानं ओंजळ भरली
खरेच आपत्ती एक चंगळ ठरली.....
गारपीट झाली
गारपिटीने पिकं भुईसपाट केली
पंचनामा करणारी बांधावर आली
त्यांचीही बर्फाने ओंजळ भरली
खरेच आपत्ती एक चंगळ ठरली....
नोटबंदी झाली
काळ्या पैशाची किंमत ठरली
पैशासाठी सामान्य वणवण फिरली
काळ्या पैशाची किंमत कवडीमोल ठरली
वशिला लावून ओंजळ भरली
खरेच आपत्ती एक चंगळ ठरली....
कोरोनाची लाट आली
नकळत लाटेवर लाट पसरली
दवाखान्यात भरमसाठ बिलं आकारली
ठेकेदारांनी पेट्यापेट्यांनी ओंजळ भरली
खरेच आपत्ती एक चंगळ ठरली....
