STORYMIRROR

KAVERI KHEDKAR

Others

3  

KAVERI KHEDKAR

Others

आपले सण -आनंद की विकृति?

आपले सण -आनंद की विकृति?

1 min
299

सणसुद या एका शब्दात जाहीर होते आपली संस्कृती

पण आपण काय साजरं करतोय ?आ आनंद की विकृती ?


संक्रांतीला तीळ-गुळापेक्षा मांजाच जास्त असतो

'पतंग उडवणे' हा आनंदकमी इर्षेचाच खेळ दिसतो


वडाची झाडे वाचविण्यासाठी शास्त्रात वटपौर्णिमा आणली होती

आपल्यासावित्री ने फांदी विकत आणुन घरीच पूजला पती


पण गणपती मात्र आणतो भाऽऽरी Diamondलावून POP चा

१० दिवस Proper पूजा अन् नंतर ढिगारा भंगलेल्या मुर्तींचा


नवरात्राच्या उपवासाची तर व्याख्याच गृहीणींनी बदलून टाकली

देवीआई लढुन, तर आपली आई उपवास करून थकली


गोकुळअष्टमीच्या थरांचा बातम्यात दरवर्षीच बोलबाला

राजकारणात कसले आलेत गोपाल अन ...कसला आलाय काला


दिवाळी म्हणजे काय ?

तर दिव्यासोबतचा फोटो स्टेटसला टाकणे

फटाक्याच्या धुरामध्ये पुढच्या पिढीचं भविष्य झाकणे


सणांचा अर्थ कदाचित आपण पाहिजे तसा काढतोय

आनंद- प्रेम तर नाही पण धोका नक्कीच वाढतोय


सणाच्या निमित्ताने आपल्याला माणसं अन् निसर्ग जपायला शिकवलंय

माणुसकीचं सोडा आपण निसर्गाचही कर्ज थकवलंय


संकटाच्या या दोन वर्षात अनेकांना भेटले दुःखद मुक्काम

पण आपल्यासह त्यांचीही दिवाळी व्हावी हे पाहणे आपल्या सर्वांच काम !


ही दिवाळी, सुख-समृद्धीसह आरोग्यदायी‌ अन् प्रेमाची ठरावी

'बंगल्यातल्या लाईट' सह झोपडीतलीही पणती उजळावी.


Rate this content
Log in