आणि माझं थोडं जगायचं राहूनच गेलं
आणि माझं थोडं जगायचं राहूनच गेलं
1 min
199
....माझं थोडं जगायचं राहूनच गेलं ....
गर्भ पोटात वाढवताना
शरीर सुबक ठेवायचं राहून गेलं
आणि घराचं घरपण जपतना
अख्ख तारुण्य माझं वाहून गेलं
आणि हो ....
माझं थोडं जगायचं राहूनच गेलं
स्वतःला वजा करून
जपत गेले सगळ्यांना
आयुष्याच्या गोळाबेरजेत मात्र
स्वतःला Add करायचं राहून गेलं
आणि हो ....
माझं थोडं जगायचं राहूनच गेलं
वणवण भटकणाऱ्या पाखरांना
हक्काचं घर मिळावं म्हणून
स्वतःच स्वतःला गुंतवतांना
माझं आकाशात मुक्त विहार
करायचं राहून गेलं
आणि हो ....
माझं थोडं जगायचं राहूनच गेल
