STORYMIRROR

Saheb Narwade

Others

4  

Saheb Narwade

Others

आम्हीही माणसं आम्हीही माणसं

आम्हीही माणसं आम्हीही माणसं

1 min
353

आम्हीही माणसं आम्हीही माणसं

हाडाकाडाची रक्तामासाची

दोन नयनाची दोन कर्णाची 

का? हीनवता परक्यावानी 


आम्हीही माणसं आम्हीही माणसं

जन्माने मी कधी श्रीमंत

गरीब कधी दीनदलित

कधी कामगार, कधी धर्मांधांचा बळी,

कधी गावकुसाबाहेरचा, कधी जगणारा

पालावरचं जीणं कधी एकाकी अत्याचार निमूटपणे सहन करणारा,

स्वीकारा हे त्रिकालबाधित सत्य जगा जगू द्या आयुष्य छानसं

आम्हीही माणसं आम्हीही माणसं


तेवढाच काळ, तीच वेदना 

तशीच नाळ, तसंच बाळ

जसा होतास तू आईच्या गर्भात, तसाच मीही त्याच गर्भात

मग कशाला धिंडोरा उच्चनीचतेचा महानतेचा, विद्वत्तेचा 

ही विद्वत्ता, ही महानता बिनबुडाची, जहागिरी नाही कुणाची

त्या सडक्या मनोवृत्तीची, खुडा मावा पडलेली कणसं

आम्हीही माणसं आम्हीही माणसं


नाती जोडावी या मातीशी अंधाराला प्रकाश देणाऱ्या वातीशी  

महालाच्या चैनीनं कुडाच्या भिंतीशी

आणि व्हावे एक जाळून टाकावेत जात-धर्म,

करावा वर्ग वर्णभेदाचा शिरच्छेद खतपाणी घालणाऱ्या सकट

पेरावी माणुसकी आणि माणुसकी जोडणारी माणसं

आम्हीही माणसं आम्हीही माणसं


Rate this content
Log in