STORYMIRROR

Pratik Hande

Others

4  

Pratik Hande

Others

आम्ही छत्रपतींचे वारस

आम्ही छत्रपतींचे वारस

2 mins
494

छत्रपतींनी शेतकरी सुखी केला खरंच , तो मेला तरी आम्हाला पडत नाही फरक ..

आम्ही छत्रपतींचे वारस...

छत्रपतींनी तलवार उचलून शत्रू कापला एक एक, त्याच तलवारीने आम्ही कापणार वाढदिवसाचे केक..

आम्ही छत्रपतींचे वारस ...

छत्रपतींकडे खूप होता स्वाभिमान , तोच स्वाभिमान आम्ही ठेवलाय गहाण..

आम्ही छत्रपतींचे वारस....

छत्रपतींसमोर मग्रूरांनी माना झुकवल्या, आम्ही मात्र मग्रूरांसमोर माना झुकवल्या

आम्ही छत्रपतींचे वारस...

छत्रपतींमुळे गरिबाला होती ३ वेळ रोटी आणि सुखात होती लाडकी बेटी ,

आम्हाला मिळतेय ना धनाची पेटी ...मग नसूदे गरिबाला रोटी आणि मेली तरी चालेल त्याची बेटी

आम्ही छत्रपतींचे वारस....

छत्रपतींनी राखली घरातली माय आणि गोठ्यातली गाय ,आमचं पोट भरतंय ना .. मग माय अन गायीचं करायचंय काय..

आम्ही छत्रपतींचे वारस...

छत्रपतींनी काळाची गरज ओळखून केला विकास , आमचं चाललंय ना झकास.. मग कशाला पाहिजे विकास

आम्ही छत्रपतींचे वारस...

छत्रपतींनी तरुण वाढवले , शिकवले , योग्य मार्गाला लावले , आम्ही तरुण पाळले आणि पक्षाच्या कामाला लावले. 

आम्ही छत्रपतींचे वारस...

छत्रपतींनी केली जनतेची सेवा , आम्ही त्यांचं नाव घेऊन गडप करतोय मेवा

आम्ही छत्रपतींचे वारस...

छत्रपतींनी सर्वस्व पणाला लावून किल्ले राखले , आम्ही अमुक 'ब' दर्जाचा तमुक 'क' दर्जाचा म्हणून भाड्याने देण्याचे निर्णय घेतले

आम्ही छत्रपतींचे वारस...

छत्रपतींनी राजेशाहीतही राखली लोकशाही ,आम्ही मात्र सारखं म्हणतोय बघू सर्वांना तुम्ही एकदा आणाच राजेशाही. 

छत्रपतींचा नियम होता कालच्या पुण्याई वर आजचा दिवस जात नाही ,आमचं मात्र छत्रपतींच्या नावावर पोट भरल्याशिवाय भागत नाही.

आम्ही छत्रपतींचे वारस....

छत्रपतींनी रुजवले होते जनहिताचे विचार , तेच विचार झालेत आमच्या प्रचाराच्या ताटाला आचार..

छत्रपतींनी राखली राष्ट्राची गरिमा , आम्ही करोडो खर्चून बांधतोय फक्त प्रतिमा

आम्ही छत्रपतींचे वारस...

आम्ही छत्रपतींचे वारस...


Rate this content
Log in