आजच्या काळापुढील प्रश्न
आजच्या काळापुढील प्रश्न
1 min
317
दुष्काळ पडला गावात
कोणाच नाही त्याकडे लक्ष
आजच्या काळापुढील प्रश्न
नका करू रे आता पक्ष...
रोजगार नाही शहरात
बेरोजगारी फार वाढली
आजच्या काळापुढील प्रश्न
याच्यावर उपाययोजना नाही काढली..
मोबाईलचा त्रास वाढला
मुले खुपच वेडी झाली
आजच्या काळापुढील प्रश्न
याची कोणाला जाग आली....
वने झाली सारी नष्ट
नाही भान मनुष्य जातीला
आजच्या काळापुढील प्रश्न
झाडांची लागवड करा सांगतो तुम्हाला....
