STORYMIRROR

Savita Patil

Others

4  

Savita Patil

Others

आजार शिक्षणाचा

आजार शिक्षणाचा

1 min
310

तू मोठा की मी

चढाओढ श्रीमंतीची


मनाचा कोंडमारा

ससेहोलपट लेकरांची


अपेक्षांच्या ज्वालांनी

होरपळ त्या जीवांची


पैसाच झालाय सर्वस्व

मनाला किंमत शून्याची


धसका घेता इंग्रजीचा

अब्रू जाते पालकांची


आवड त्यांची जाणाहो

भीती नको इंग्रजीची


हलकं पारडं बालकांचं

भूल पडे पैशाची


अट्टाहास हा कशापायी

किंमत जाणा जीवनाची


राजहंस काळजातील

भूक त्यांना मायेची


हसत खेळत शिकू द्या

मजा लुटू द्या जीवनाची


Rate this content
Log in