आईच्या मिठीत असताना
आईच्या मिठीत असताना
1 min
265
किती आनंद होतो तिच्या मिठीत असताना,
स्वर्ग ही फिका भासतो मज तिच्या मिठीत असताना.
आयुष्यातील सर्वात पहिली मीठी तिनेच दिली,
सूर्याची दाहक्ता शांत होईल भासतो इतका गारवा तिच्या मिठीत असताना.
कोणत्याच दुःखाचे मला स्पर्शून जाण्याचे
धाडस होत नाही,
मी दिसतो निजलेलो त्यांना तिच्या मिठीत असताना.
मी तर विसरून जातो नेहमी काल एकले कुणा संताकडून की,
देवही देव असल्याचे विसरून जातो म्हणे आईच्या मिठीत असताना.
