आईची पापणी
आईची पापणी
1 min
432
सोनुली गं...छकुली तु...तान्हुली गं तु..
या आईच्या डोळ्यांची पापणी गं तु..॥
पौर्णिमेच्या चंद्राचा मुखडा गं तु...
या आईच्या काळजाचा तुकडा गं तु...
सोनुली गं...छकुली तु..तान्हुली गं तु...
या आईच्या डोळ्यांची पापणी गं तु..॥
बहरलेल्या वृक्षाचि छाया गं तु...
या आईच्या ममतेची माया गं तु...
सोनुली गं...छकुली तु..तान्हुली गं तु...
या आईच्या डोळ्यांची पापणी गं तु..॥
समुद्रातील शिंपल्याचा मोती गं तु...
या आईच्या नयनांची ज्योती गं तु...
सोनुली गं...छकुली तु..तान्हुली गं तु...
या आईच्या डोळ्यांची पापणी गं तु....॥
