आई
आई
1 min
293
आई म्हणोनि कोणाला हाक मारावी,
ती तर केव्हाच सोडूनि मज गेली दूर.
आई होती तेंव्हा नाही कळली किंमत,
तुझ्याविना जगण्यात आता राहिली नाही हिम्मत. आई म्हणोनि...
आईची माया, ममता, वात्सल्य
संसारात रमतांना कधी ना कळले,
आता वेळ गेली निघूनी
मन मात्र गहिवरले. आई म्हणोनि...
दोन साड्यांची एक
साडी करून नेसलीस तू,
रक्ताचे पाणी करुनि
मज मोठे केलेस तू,
माझ्यावरचे छत्र सोडून निघून गेलीस तू , आई म्हणोनि...
आईविना जीवन जगतांना,
होतात वेदना काळजाला.
जसा गाईने हंबरडा फोडावा पाडसाला,
मात्र भोकं पडतात माझ्या हृदयाला. आई म्हणोनि...
