आई
आई
1 min
244
नाभीची नाडी तुटली अन् तीच्या
उदरातून आयुष्यातील पहिली श्वास घेतला मी
असंख्य वेदना सहन करुन मला
हातात घेऊन मी रडतांना
पहिल्यांदा मनातुन हसली ती
मला मायेनं कुरवाळण्याची नऊ
महिन्यांची होती तीची घाई
मला न कळता उदरातही कुरवाळत होती ती
अनोळख्या जगी पहिली सोबती
मला माझी आई
माझी सर्वस्व पहिली
मी असल्यची साक्ष झाली
प्रत्यक्ष नसताना अप्रत्यक्ष सोबती माझ्या ठायी ठायी
प्रत्येक वेळी मला सोबती
माझी आई
पहिल पाऊल तीच्याच सोबत
हसणं माझं जसं पदरात घेतलं
तीनं सावरत
अबोल बोल माझ शिकवला
तीनं शब्द
हळु हळु बोलकं करून
स्वतः ची झाली स्तब्ध
तीच्या ओठांवरच हास्य
हेच माझ्या जगण्याच रहस्य
माझ्या कित्येक आठवणींची
पेटती समई
सर्वांन परि ष्रेष्ठ मला माझी आई
