आई...!
आई...!
1 min
197
कोणत्या शब्दात सांगू आई
तू माझ्यासाठी काय आहेस..?
भुकेल्या जीवाचा मायेचा घास तू
वेदनेनंतरची माझी पहिली हाक ती
अन् माझा प्रगाढ विश्वास तू
हृदयाच्या स्पंदणातील प्रत्येक श्वास तू...!
जीवनातील सुखाची बाग तू
अधिमधी सूर्याची आग तू
अंधारालाही दूर करणारा प्रकाश तू
माझी मायेची धरती अन् छायेचं
आकाश तू..!
मायेच्या पावसाचा ओलावा तू
जीवनी सुखाचा गारवा तू
आई दुधरुपी अमृताचा गोडवा तू
अन् शेवटच्या क्षणापर्यंत चा कुशीतील विसावा तू..!!!
