STORYMIRROR

Vaishnavi Borse

Others

4  

Vaishnavi Borse

Others

आई माझे दैवत

आई माझे दैवत

1 min
248

आई म्हणजे आत्मा आणि ईश्वराचा पावन संगम

आई म्हणजे प्रेम आणि मायेचे अतुट बंधन 

आईनेच होते जिवनाची सुरूवात 

आईच देते जिवनाला आकार 


तिच दुर्गा तिच सरस्वती 

तिच अंबर तिच धरती

तिच छाया तिच माया

तिच्या विना जगणे वाया


आई श्वास, तिचाच ध्यास

तिच्याचमुळे मिळतो जगण्याला विश्वास

आई सुख,ईश्वराचे रूप

अपयशाशी लढण्याचा तिच देते हुरुप


आई तुझ्या चरणी वैकुंठ, तूच माझा पांडुरंग

आई उच्चारानेच होई, सगळया वेदनांचा अंत

या जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरू

त्यानंतर झाले माझे अस्तित्व सुरू


आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाहीत, 

तिचे उपकार फेडणे सात जन्मातही शक्य नाही

देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो तिला

माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन