आगंतुक पाहुणा
आगंतुक पाहुणा
त्याच्या आगंतुक आगमनाने,
बदलले जीवनाचे सारे संदर्भ
प्रत्येकाला भाग पाडलंय त्याने ,
करायला नव्या जीवनशैलीचा आरंभ.......१.........
तो मानत नाही रंग,वर्ण, धर्मभेद
ना जात ना पात
वृत्ती त्याची विध्वंसक,
कारवाया त्याच्या जणू घातपात........२.........
अदृश्यपणे आहे त्याचा वावर
सगळीकडे माजवतोय हाहा:कार
वेठीस धरलेय अखिल मानवजात,
पसरवत सर्वत्र निराशेचा अंध:कार.......३.......
आकड्यांचा पाहून खेळ,धास्तावतय मन,
गोठतोय श्र्वास
प्रत्येकालाच लागलीय आस,
साठवायला डोळ्यात निरभ्र आकाश......४........
गंगामाई झाली निर्मळ
पर्यावरणाचाही थांबलाय ऱ्हास
झाडं,झरे,पशु ,पक्षी,
स्वछंदीपणे घेऊ लागलेत मोकळा श्वास......५....…
नाही रहाणार तो इथे कायम,
मुसक्या आवळून करु तडीपार
आत्मनिर्भर बनवून भारत देश,
क्लेश मिटवण्याचा करु निर्धार........६.......