आगंतुक पाहुणा कोरोना
आगंतुक पाहुणा कोरोना


यावर्षी मात्र कोरोना झाला पसरण्यास राजी !!
वाहतूक सर्व व्यवहार बंद करून
शहरे गावे केली लॉकडाऊन
संचारबंदी कोरोनाच्या भीतीने
सर्वजण गेले घाबरून !!
गावे शहरे माणसांविना
दिसू लागली ओसाड
गावातील कष्टकरी
झाले यापासून बेजार !!
नोकरी गेली पगार नाही
सारे एकमेकांना कोसती
कोरोनाच्या भीतीने
भ्रमणध्वनीवरच पुसती !!
सर्दी ताप आला की
गांगरून जाती माणसे
खोकताच माणूस संशयाने
अजूनच गांगरून जाती !!
लॉकडाऊनच्या काळात
अनेकांनी केली लूट
बर्थडे लग्न यातून
सर्वांनाच मिळाली सूट !!
सण नाही उत्सव नाही
सारे घरातच असती
मास्क ,सॅनिटायझर सोसिअल डिस्टन्स
शब्द मनातच बसती !!
लॉकडाऊनच्या काळात पक्षी ,प्राणी आले
जंगल सोडून रस्त्यावर
माणसाप्रमाणे स्वच्छंदी फिरण्याचं
नशीब त्यांचं जोरावर !!
कोविड १९ विषाणूने
अख्या अंगाला ग्रासलं
पोलीस ,डॉक्टर्स ,नर्स यांनी
अनेकांना तारलं !!
आशा ,अंगणवाडी सेविका ,शिक्षिका
सर्वेक्षणात गुंतल्या
पोलीस ,शिक्षकांना दिल्या
चेकपोस्टच्या डयुट्या !!