आधुनिक काळातील स्त्री
आधुनिक काळातील स्त्री
1 min
217
बंध सारे झुगारून मी
व्यक्त झाली जगासमोर
आधुनिक युगातली स्त्री
नाही झुकणार कुणासमोर
प्रत्येक क्षेत्रात माझी
ओळख आहे स्वतःची
गर्वाने सांगेन मी जगास
मी स्त्री ही नव्या युगाची
नव्या दिशा नव्या वाटा
माझ्यासाठी सगळ्या खुल्या
प्रत्येक क्षेत्रात पाऊल टाकते
नकोच आता नीयमावल्या
काळ बदलला मी ही बदलली
काळानुसार चालू लागली
न थांबता कुठेच मध्ये
सैर पर्वतांची मीही केली
भूमिका किती निभवता
माझ्यामधली मी जागली
आधुनिक युगाची मी
ऊंच आकाशी झेपावली
