गीतबहार
गीतबहार
ये जिंदगी के मेले दुनिया मे कम होंगे
अफसोस हम न होंगे
दुनिया हैं मौजै दरिया खतरेकी जिंदगीका
पानी में मिलके पानी अंजाम हैं क्या
जाऐंगे हम अकेले ये जिंदगीके मेले
दुनिया में कम न होंगे
अफसोस लम न होंगे
या गाण्यातला शब्द न शब्द किती खरा आहे...
रफी गेल्याची बातमी आली तेव्हां रमझान महिना तूफान पाऊस कोसळत होता.. अवघं बाविस वर्ष वय. गाणी आवडण्याचं पाठ झाली की गुणगुणायचं. सिलोनवर रफींच गाण लागलं की उभं राहून ऐकायचं. गाण्याची आवड निर्माण झाल्यावर रफीसाहेब लतादीदी आणिमखमली आवाजातले तलत हीच गाणी आवडत गेली. काच उत्तर नाही. पण मनापासून सॅड साॅंगच आवडली.. आता मोबाईल आहेत येता जाता प्रवासात ऐकण्यासाठी. पण तेव्हा रेडिओ घरात असणं एक श्रीमंतीच लक्षण होतं. टि व्हि सुध्दा घरात नव्हता. आणि छायागित लागलं की मैत्रीणीच्या घरी बघायला जायचे. ते पण ती येउन काका आज टि व्हि बघायला घरी पाठवा सांगायला यायची. आता घरघरन तीन तीन टिव्हि आहेत...
गाण्यासाठी मात्र नो एसक्यूज.. आवडीचच आणि आवडत्या सिंगरचच.. त्यात काही ही बदल होऊ शकला नाही. आणि होणार ही नाही.
याहू आरोळी ऐकली की तो नक्कीच शम्मी कपूर असणार. मन तडपत म्टलं की भारतभूषणचा चेहेरा नजरेसमोर तरळणार.. आणि गुजरे हैं आज ईश्क में हम ईस मकामसे म्हटलं की दिलीप कुमार... बहारों फुल बरसाओ मेरा महबूब आया है तर कधी ये मेरा प्रेम पत्र पढकर राजेन्द्र कुमार ही गणितं ठरलेली...
मनावर कोरलेली ही गाणी. ये महलों ये तख्तों ये ताजोंकी दुनिया ये इन्सान के दुश्मन... ही गाणी लिहिणार्यांनी प्राण ओतले होते. काय गजबचं लिखाण..
मासूम चेहेरा ये कातिल अदाए डूबों दे न हमको ये लाकर कनारे
मुहब्बत की ऊंचाई पर आ चुके हम
के अब राहकी धूल हैं दोनो आलम
हे पाठ करायला नाही लागायच पण मनातल्या डायरीत ते शब्द आपसूकच जतन व्हायचे कसे... माहित नाही.
रंग और नूर की बारात किसे पेश करू.... सुनिल दत्त.... दिल जो न कह सका वहीं राजे दिल कहने की रात आयी.
जिंदाबाद जिंदाबाद ए मुहब्बत तू जिंदाबाद.
दौलतके जंजीरोंसे तू रहती आबाद...
या सारखी गाणी लिहिली ही जाणार नाहीत...
बाबूल की दुआऐं लेती जा जा तुझको सुखी संसार मिले
मन तडपत हरी दरशनको आज
मैं जिंदगीका साथ निभाता चला गया.
दिन जो पखेरू होते पिंजरेमे मैं रख लेता पालता उनको जतनसे..मोतीके दाने देता... याद न जाए...
आसमानसे आया फरिश्ता प्यार का सबक सिखलाने
ये दुनिया उसीकी जमाना उसीका..
हां तुम मुझें यूं भूला ना पाओगे. जब कभी भी सूनोगे गीत मेरे संग-संग गुनगुनाओगे. हा तुम मुझें यूं...
खरचं सोप आहे का विसरणं.
