तुझ्या माझ्यात आत्ता तसे काहीच नाते उरले नाही जगासाठी पूर्वीसारखे आपले चांदणे राहिले नाही नदीच्या दोन किनारासारखे आपले ओलावे दुभागून गेले परस्पपर समरूप जरी आपसूक नाते विरोधात गेले कवी - त्रिवेंद्र
ठेस लागते तेंव्हा वेदनेला खरा अर्थ येतो . अन .... येणाऱ्या अर्थाला पान्हा फुटतो तेंव्हा सिद्धार्थ मधून बुद्ध जन्म घेतो . .......त्रिवेंद्र
खूप काही लिहायचे आहे खूप काही बोलायचे आहे. वेदेसह ...वयाला पुन्हा नव्याने पेरायचे - उगवायचे आहे. ........त्रिवेंद्र
जीवनाला समजण्यास थोडा उशीर झाला वेळ आहे म्हणण्यात ... खरा काळ सांडून , सोडून गेला जीवना कसे सांगू तुला ? मी माझ्या पर्येंत पोहचण्यास विलंब झाला ...