Trivendra Bhore

13
Posts
0
Followers
0
Following

I am Advocate but i am interested in Marathi writing

Share with friends

तुझ्या माझ्यात आत्ता तसे काहीच नाते उरले नाही जगासाठी पूर्वीसारखे आपले चांदणे राहिले नाही नदीच्या दोन किनारासारखे आपले ओलावे दुभागून गेले परस्पपर समरूप जरी आपसूक नाते विरोधात गेले कवी - त्रिवेंद्र

ठेस लागते तेंव्हा वेदनेला खरा अर्थ येतो . अन .... येणाऱ्या अर्थाला पान्हा फुटतो तेंव्हा सिद्धार्थ मधून बुद्ध जन्म घेतो . .......त्रिवेंद्र

खूप काही लिहायचे आहे खूप काही बोलायचे आहे. वेदेसह ...वयाला पुन्हा नव्याने पेरायचे - उगवायचे आहे. ........त्रिवेंद्र

जीवनाला समजण्यास थोडा उशीर झाला वेळ आहे म्हणण्यात ... खरा काळ सांडून , सोडून गेला जीवना कसे सांगू तुला ? मी माझ्या पर्येंत पोहचण्यास विलंब झाला ...

सागर काठच्या तुझ्या पूल खुणांना अजून मी जपले आहे. पाण्याच्या त्या लहरींना नजरेने अजून या रोखले आहे.

तुझ्या श्रावणाचे थेंब माझ्या गुलाब पाकळ्यांना आग देऊन गेले. कसे सांगु जगास मी? ओल्या सरीआड, माझे वन, वणवा होऊन चिंब चिंब झाले....


Feed

Library

Write

Notification
Profile