@prabhakar-patwardhan

prabhakar Patwardhan
Literary Captain
97
Posts
0
Followers
0
Following

प्रोफाइल मला लेखनाची गोडी अलीकडेच लागली .विविध विषयांवर मी लेखन करीत असतो .कृष्णमूर्ती व त्यांचे लेखन याबद्दल मी बरेच काही वयाच्या पंचवीशीत वाचले व लिहिले आहे .हल्ली मी माझ्या पूर्वीच्या लेखनाचे सुधारित स्वरूपात मला समजलेले व उमजलेले कृष्णमूर्ती या नावाने स्वतः डिजिटलायझेशन केले .... Read more

Share with friends

.मी भौतिक स्मरणाबद्दल बोलत नाही तर मानसिक स्मरणाबद्दल बोलत आहे.जोपर्यंत अनुभव समज यथार्थ व संपूर्ण आली नाही तोपर्यंत अवशेष शिल्लक राहणार. हेच जुने,हेच भूत,हाच गेला दिवस, हीच ती वास्तविक मृत परंतु जिवंत होणारी वस्तू, की जी नव्याला शोषून घेते व अशा प्रकारे त्याचा नाश करते .जेव्हा मन जुन्यापासून भूतापासून स्वतंत्र असते तेंव्हा व तेव्हाच ते नाविन्याने जीवनाला भेटू शकते व त्यातच आनंद असतो.

विश्लेषणाने उदाहरण सोडविण्याची चुकीची पद्धत जेव्हा तुमच्या लक्षात येईल ,तेव्हाच वर सांगितलेली नुसते ऐकण्याची मोकळ्या मनाने समजून घेण्याची पद्धत  शक्य होईल. जेव्हा तुम्ही असत्य हे असत्य म्हणून पाहाल तेव्हा तुम्हाला सत्य म्हणजे  काय ते समजू लागेल . हे सत्यच तुम्हाला पार्श्वभूमीपासून स्वतंत्र करणार आहे . ++++++++++++++++++

एकावर प्रेम कसे करावे हे आपल्याला कळत नाही म्हणून मानवतेवरील प्रेम हा आभास आहे .जेव्हां प्रेम असेल तेव्हां आणि तेव्हांच फक्त आपल्या सर्व समस्या सोडविल्या जातील .नंतर आपल्याला परमेश्वराचा वरदहस्त म्हणजे काय व आनंद म्हणजे काय हे कळेल . ++++++++++++++++++

.जेव्हा मन स्वतःची संपूर्ण प्रक्रिया समजते तेव्हा ते स्वतःचाच नाश करून घेते.म्हणजेच विचार नष्ट होतो.फक्त तिथेच सृजन असते.ते सृजन आपल्याला आनंदी करते .त्या सृजनशील स्थितीत असणे म्हणजेच परमेश्वराचा वरदहस्त असणे होय .कारण फक्त तिथेच संपूर्ण स्वत:ला विसरणे असते. तिथे मी पासून कुठलीही प्रतिक्रिया नसते .दैनंदिन लैंगिक समस्येला हे काही तरी तात्त्विक उत्तर नाही. फक्त हेच खरे उत्तर आहे .

जेव्हा मन विचाराला सातत्य पुरवत नसेल,त्याला सातत्य देत नसेल,जेव्हा ते अनिर्मित शांततेत असेल ,म्हणजेच कारण व कार्य यांच्याशिवाय असेल,तेव्हाच आणि फक्त तेव्हांच पार्श्वभूमीपासून स्वातंत्र्य प्राप्त होईल .

एखाद्या संध्याकाळी जेव्हा वारा नसेल तेव्हा तळे ज्याप्रमाणे शांत होते. लहरी पासून मुक्त होते. त्याप्रमाणेच हे आहे.जेव्हा मन निस्तरंग असते तेव्हाच ते न मोजता येणारे अस्तित्वात येते .

.जे आहे ते समजणे त्याबद्दल जागृत असणे यातून असामान्य (मानसिक) खोलीचा साक्षात्कार होतो .त्यातच सत्य व आनंद असतो . ++++++++++++++++++

.आपण स्मरणाला वर्तमानातून जीवन देतो .जेव्हा आपण स्मरणाला जीवन देत नाही तेव्हा ते आपोआपच नष्ट होते .भौतिक स्मरण तांत्रिक स्मरण ही आवश्यक गोष्ट आहे .मानसिक संग्रह म्हणून स्मरण हे जीवन समजण्यासाठी मारक आहे .एकमेकांजवळ खरे दळणवळण प्रस्थापित होण्यासाठी ते मारक आहे . ++++++++++++++++++

म्हणून सत्य किंवा परमेश्वर तुम्ही जे काही म्हणाल ते, ही प्रतिक्षणी अस्तित्वात येणारी वस्तू आहे .मन जेव्हा एखाद्या शिस्तीने विशिष्ट आकारात ठेवलेले असते तेव्हा नव्हे, तर फक्त स्वतंत्र स्वयंभू उत्स्फूर्त स्थितीतच हे शक्य होते.परमेश्वर ही मनापैकी वस्तूच नव्हे . स्वआराखडय़ातून ती येत नाही .जेव्हा केवळ सद्गुण म्हणजे स्वतंत्रता असते तेव्हा ती येते.जे काही आहे त्या वस्तुस्थितीला तोंड देणे म्हणजेच सद्गुण.


Feed

Library

Write

Notification
Profile