“
.मी भौतिक स्मरणाबद्दल बोलत नाही तर मानसिक स्मरणाबद्दल बोलत आहे.जोपर्यंत अनुभव समज यथार्थ व संपूर्ण आली नाही तोपर्यंत अवशेष शिल्लक राहणार. हेच जुने,हेच भूत,हाच गेला दिवस, हीच ती वास्तविक मृत परंतु जिवंत होणारी वस्तू, की जी नव्याला शोषून घेते व अशा प्रकारे त्याचा नाश करते .जेव्हा मन जुन्यापासून भूतापासून स्वतंत्र असते तेंव्हा व तेव्हाच ते नाविन्याने जीवनाला भेटू शकते व त्यातच आनंद असतो.
”