रंगीत रंगीत फुलपाखरू पक्ष्यांचा थवा दारी खोऱ्यातून वाहणारा खट्याळ तो वारा रात्रीच्या नभाला तारकांनीच शोभा चंद्र घेऊन साथीला लपंडाव त्यांचा रंगला .........गौरी
#बंध प्रेम माया भक्ती जुळून येतात अनुबंध देणं घेणं उरलं सुरलं जुळवून आणतात ऋणानुबंध नाजूक कोमल हळुवार हे बंध रेशमाचे हृदयातून हृदयाशी बंध हृदयाचे
अशी एक वेळ जेव्हा खूप उजेड हि नसतो आणि रात्री चा काळा अंधार हि नसतो अश्या वेळेला जेव्हा दिवस आणि रात्र एकमेकांच्या मिठीत असतात, ती जोडणारी वेळ म्हणजे संधिप्रकाशाची वेळ
जीर्ण रीतींचे घाव हे ,सोसणे मी सोडले उमलुनी राखेतून आता स्वप्न नवे मी पहिले एकवटून जीव आता बळ पंखात आणले क्षितीजाच्या भाळावरती यश कीर्ती चे मळवट भरले गौरी एकबोटे
एका स्त्री च आयुष्य किती वेगवेगळ्या छटांचं असत ,प्रत्येक बदल स्त्रिया स्वीकारता , परिस्थिती वर मात करून परत हिम्मतीने ती पुढे वाटचाल करता एका नवीन सुरुवातीसाठी
मानव जात , शापित जात .....शाप मिळालाय त्यांना इच्छा , अपेक्षा , आकांशा ह्यातून ते बाहेर नाही निघू शकत ..... आनंदी स्वच्छ जगणं त्यांना नाही जमत .....