STORYMIRROR

# I am…

SEE WINNERS

Share with friends

मी आहे...

 

प्रास्ताविक

मी लेखक आहे.

माझे शब्द, माझं स्टोरी मिरर

कथा, कविता आणि कोट्सच्या माध्यमातून मला माझे पंखातलं आभाळ तुम्हाला दाखवू द्या. कारण जोपर्यंत तुम्ही पंख पसरत नाही तोपर्यंत तुम्ही किती उंच भरारी घेऊ शकता, याची कल्पना तुम्हाला येऊ शकत नाही.

तुमचं स्टोरी मिरर तुम्हाला पंख पसरण्याची एक संधी देते. त्याद्वारे तुमच्या ऊरात खोलवर लपलेल्या सुप्त विचारांच्या उंचीपर्यंत पोचण्याची आणि त्यांना हृदयस्थ शब्दांद्वारे प्रवाहित करण्याची संधी देत आहे.

तुमच्या आवडीच्या विषयावर कथा, कविता आणि कोट्स लिहा.

 

नियम-

  • कथा, कविता किंवा कोट्स हे तुमच्या आवडीच्या कोणत्याही विषयावरील असू शकतात.
  • सर्व प्रकारच्या कथा, सर्व प्रकारच्या कविता आणि सर्व प्रकारचे कोट्स स्वीकारले जातील.
  • साहित्यप्रकाराबद्दल कोणतेही बंधन नाही.
  • सर्व सबमिशन्स या स्पर्धेच्या लिंकद्वारेच करणे बंधनकारक आहे.
  • सहभागींनी त्यांच्या मूळ कविता/कथा/कोट्स दाखल करावेत.
  • दाखल करायच्या कथा, कविता किंवा कोट्सच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही.
  • https://storymirror.com येथे या आधीच दाखल केलेल्या कथा, कविता किंवा कोट्स पुन्हा दाखल करू नयेत.
  • स्टोरी मिररचा निर्णय अंतिम आणि सर्व सहभागींवर बंधनकारक असेल.
  • लेख/निबंध दाखल करण्यास परवानगी नाही.

 

बक्षीसे

  • प्रत्येक भाषेतील तीन सर्वोत्कृष्ट कथा, कविता आणि ऑडिओंना स्टोरी मिररकडून रूपये 250 चे शॉपिंग व्हाऊचर देण्यात येईल. हे व्हाऊचर वापरून तुम्हाला https://shop.storymirror.com येथे खरेदी करता येईल.
  • प्रत्येक भाषेतील पहिल्या तीन विजेत्यांना स्टोरी मिररककडून गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉंझ मेंबरशीप देण्यात येईल.
  • सर्वोत्तम कथा आणि कविता स्टोरी मिररच्या सोशल मीडियावर प्रसारीत केल्या जातील.
  • प्रत्येक भाषेतील आणि कॅटेगरीतील सर्वोत्तम 10 रचनांना स्टोरी मिररकडून सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स देण्यात येईल.
  • स्पर्धेसाठी आलेल्या सर्व भाषांतील सर्वोत्तम कथा आणि कवितांचे स्टोरी मिररकडून ई-बुक बनविण्यात येईल.
  • संपादकांनी दिलेले गुण, मिळालेले एकूण व्ह्युज आणि लाईक्स याच्या आधारवर विजेत्यांची निवड करण्यात येईल.
  • 30 ऑगस्टपर्यंत मिळालेले एकूण व्ह्यूज आणि एकूण लाईक्स स्पर्धेसाठी विचारात घेतले जातील.

 

पात्रता

सबमिट करण्याचा कालावधी 29 जुलै 2019 ते 15 ऑगस्ट 2019

निकाल प्रसिद्धीची तारीख 30 ऑगस्ट 2019

भाषा इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, ओडिया, बांगला

कंटेन्ट टाईप कथा/ कविता/ कोट

संपर्क marketing@storymirror.com/ 02249243888/ 022 – 49240082