ताई - लग्नाच्या एक दिवस आधी
ताई - लग्नाच्या एक दिवस आधी
1 min
372
शब्दांची गुंफन शिकन्याआधी ममतेची सावली मिळाली,
तुज्या ममतेच्या परिस स्पर्शाने जिवनाची किंमत कळाली
घडी पळाली, वेळ बदलली, शब्दांनाही पंख फुटले,
आठवनींची शिंपले सोडुन बालपणाचे मोती मागे सुटले
लोभी मनाला वाटे नेहमी जवळीक तुजी हि सदा असेन,
जीवनाच्या काव्यपटलावर हि हास्यमोहर सदा दिसेन
प्रेम सदृश्य राग तुझा तो , नाळ आयुष्य नौकेचा
अल्लढ जग पण माने तुजला ऐवज जणू परक्याचा
आयुष्याची रित म्हणा वा थट्टा या नाशिबाची,
अधांतरी संबंंध दुरावतीन, उरेल उणीव त्या बहिणीची.
गालावरची गोड खळी, आठवेन मला क्षणोक्षणी,
कधी फुलवेल अंकुर हर्षाचे, कधी आणेन डोळयात पाणी.
ताऱ्यांमधला शुक्र जणू तू , नाही कुणाला तुझली सर ,
हळुच अश्रुतुन शब्द उमटतीन,
ताई,
थोडा वेळ अजुन असता तर ……..
