STORYMIRROR

Digamber Kotkar

Others

3  

Digamber Kotkar

Others

माझं काळीज

माझं काळीज

1 min
523

तू माझा जीव की प्राण

तूच रे माझं काळीज,

तू माझा आधार लेका

तूच सळसळती वीज...१


तुझ्याच सुखासाठी बघ

झुंजतोय प्रत्येक दुःखा,

मी राहिलं उपाशीपोटी

मात्र बाळा तू पोटभर खा...२


नको करुस कसली चिंता

तुझा बा जित्ता असेपर्यंत,

राबेल अखेरच्या श्वासात

नाही घेणार मी रे उसंत….३


खूप शिकून सान लेका

तू लई मोठा माणूस बन,

पण पैका पाहून गर्वाने

कधीच ढळू देऊ नको मन...४


आभाळाला शिवला तरी

तुझे पाय मातीवरच राहू दे,

कितीही धनवान झालास बाळा

मनी माणुसकीला तू थारा दे...५


कधीच विसरू नकोस तू

आपल्या बापाचे तू हे कष्ट,

परिस्थिती कशी ही असली तरी

राहा आपल्या कर्माशी एकनिष्ठ...६



Rate this content
Log in

More marathi poem from Digamber Kotkar