चाहूल
चाहूल
1 min
185
बालिशतेला आली
अल्लडतेची नशा
फुलला मोहर
दिशा दिशात.
अवखळपण गेले
चंचलता विरेे
नवप्रभाती संगे
नवे स्वप्नन फुलेे.
चाहूल नवखी
लुडबुड करे
अल्लड या मनी
गोड हर्ष पेरे.
भविष्याचा आधारस्तंभ
कुशीत माझ्या डोले
आई होऊन ती
सृष्टी संगे बोले.
