सखी
सखी
1 min
145
नयनात सखे ग मी तुझ्या रमावे स्वप्नात सखे ग तू माझ्या असावे
जीवनाच्या वाटेवरची दिशा तू असावी रात्रीच्या अंधारात प्रकाशमय ज्योत तू दिसावी
तुझ्या माझ्या प्रेमाची नदी समुद्रात मिळावी पण
मिळालेल्या नदीची गोडी समुद्रात ही अगदी तशीच असावी
प्रेमाच्या या अथंग सागरात वाहून आपण जाऊ
आपल्या प्रेमाची कीर्ती जगाला दाखवून देऊ
