दीड जीबी
दीड जीबी
1 min
593
दीड जीबीने घातलंय थैमान
सर्व जनजीवन झालंय हैराण
यानं प्रगती झाली का नुकसान
हे कळायला असायला हवे भान
तरुण पिढी सतत आहे ऑनलाईन
यांमुळे नक्कीच वाढतंय बेरोजगारीपण
कोण सांगणार या तरुण पिढीला
हे सर्व सोडून लागा कामा-धंद्याला
दीड जीबीने व्यापलंय जनजीवन
यामुळे नक्कीच कमी झालंय माणुसकीपण
आता कोणालाच कोणाची गरज नाही
कारण आता ऑनलाईन आहे सर्वकाही
दीड जीबीने मित्र राहिला नाही मित्राचा
यामुळे कमी झालाय वारसा प्रेमाचा
म्हणून म्हणतो लवकर सारे व्हा जागे
नाहीतर कोणीच रडणार नाही आपल्यामागे
