ती कवितेची कविता...
ती कवितेची कविता...
कवितेची कविता ऐकवत
होतं मला कुणी,
भिंती होत्या डोंगरांच्या
वारा गिरवत होता गाणी..
हात धरून तेव्हा सोबत
चालत होतं कुणी,
आता हात सोडून नुसत्याच धावत सुटतात आठवणी..
सुकलेली काहीं पानं मरून ही का जगतात,
सख्यांच्या सावलीत परकं होऊन ऊन वेचतात..
कुठेतरी क्षण वेळे पेक्षा मोठे असतात ;
जसे कधी-कधी संधीप्रकाशातही काजवे दिसतात..
प्रत्येक दिवस माझ्या स्मरणात उतरून माझ्या
अस्तित्वाचा निरोप घेतो..
मी दिवसेंदिवस मात्र विचारांची लेखणी चालत नाही म्हणून सतत ती, झटकत राहतो..झटकत राहतो..आणि झटकतच राहतो...
नकळत शब्दांच्या तेलात आयुष्याची शाई उडते..
एकाच रंगात अनेक रंग, अन् अनेक क्षणात अंग-अंग तरंगवते...
किमया म्हणावी त्या ज्योतीची, जी खोल अंतरात गाभारा करूनी भावनांच्या छायेला स्पर्श करते.
हात धरून क्षणांचे जुन्या, पाहिल्या त्या आठवणी; त्यांचे प्रतिबिंब म्हणते मला प्रेम जगत रहा क्षणोक्षणी..
किमया म्हणावी त्या कवितेची, जी ऐकवत होतं मला कुणी भिंती होत्या डोंगरांच्या वारा गिरवत होता गाणी…®
