यश
यश
यश म्हणजे....
यश म्हणजे कल्पनापूर्ती
यश म्हणजे अपार कीर्ती
यश म्हणजे प्रगती
यश म्हणजे लोभ, अहंकार यांना दिलेली मूठमाती
यश म्हणजे धन
यश म्हणजे समाधान
यश म्हणजे नव्याने जगण्याची उमेद
यश म्हणजे वक्त्याला श्रोत्यांकडून मिळालेली दाद
यश म्हणजे स्वच्छंदपणे जगणे
यश म्हणजे रुग्ण बरा होऊन घरी येणे
यश म्हणजे क्षमता
यश म्हणजे हेतुसाधता
यश म्हणजे आशा
यश म्हणजे आकांशा
यश म्हणजे अतोनात प्रयत्न
यश म्हणजे मानसिक दृष्टिकोन
यश म्हणजे विकास
यश म्हणजे कधीही न संपणारा प्रवास
यश म्हणजे मदतीचा हात
यश म्हणजे अथक मेहनत
यश म्हणजे ध्येय
यश म्हणजे उत्तम आरोग्य
यश म्हणजे सकारात्मक विचार
यश म्हणजे हितकारक कृती
यश म्हणजे प्रामाणिकपणा
यश म्हणजे ज्ञानाने अज्ञानावर केलेली मात
यश म्हणजे मैत्रीचे जतन
यश म्हणजे तळमळ
यश म्हणजे अपयशाची दुसरी पायरी
यश म्हणजे लहान बाळाने टाकलेले पाहिले पाऊल
यश म्हणजे कटू गोड आठवण
यश म्हणजे यश असते
यश म्हणजे यश असते
