Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aishwarya Rajesh Mapara

Others

5.0  

Aishwarya Rajesh Mapara

Others

दिखाव्याचे जग

दिखाव्याचे जग

1 min
407


पूर्वी कसा दिवस आमचा आरामात जायचा

सुख-दुःख वाटण्यात वेळ निघून जायचा


सुख वाटताना कशाची भीती नाही

दुःख वाटताना कोणा कमीपणा नाही


काचापाणी, सागरगोटे खेळ कसे रंगायचे

एकमेकांशी खेळण्यात अनेक तास सरायचे


त्या वातावरणात खरंच काही जादू होती

चेहऱ्यावरचे हसू आणि डोळ्यातली असावे खोटी नव्हती


चेहरे कसे साऱ्यांचे कायम प्रसन्न दिसायचे

एकत्र आल्यावर आपले श्रेष्ठत्व हवेत विरून जायचे


माणूस कसा कधी स्वतःपुरता जगला नाही

शेजारधर्म पाळण्यात त्याला कमीपणा वाटला नाही


आता कसे सारे चित्र पालटले आहे बघ

बाहेर मात्र दिसते आहे दिखाव्याचे जग


मोबाईल सोडून दुसरीकडे रस कोणा वाटत नाही

जगाच्या उठाठेवी मी कशाला झेलु बाई


We are close friends च्या पुढे कोणी जात नाही

GN, GM शिवाय कोणाला कोणाची पडली नाही


अंगणात बसून हसणं सगळेच जण विसरत आहेत

मुलांना देण्याचा वेळ लोक मोबाइलला देत आहेत


माणूस येऊन बसे शेजारी याचा काही पत्ताच नाही

Chat करण्यात वेळ जातोय प्रत्यक्ष बोलायला वेळच नाही


अशा या जगात प्रसन्नता हरवत आहे

माणसाचीच माणसाला गरज आहे हेच तो विसरत आहे


दिखाव्याचे मित्र कधी कोणाच्या कामी येईनात

मोबाईल सोडाल हातातून तरच लोक देतील साथ


सुख-दुःखाच्या प्रसंगी माणसांचीच गरज आहे

खरे मित्र जमवण्याची हीच खरी वेळ आहे


सोडू आता मोबाईल हातचा अंगणामध्ये हिंडू

पुन्हा एकदा खरंखरं sharing सुरू करू


दिखाव्याचे जग आता मागे सोडू या

पुन्हा एकदा जुना वारसा हाती घेऊ या


Rate this content
Log in

More marathi poem from Aishwarya Rajesh Mapara