आई
आई
आई असते प्रत्येक जीवाला
आईशिवाय जन्मच नाही
आईची महती तिच्या जिवनी
कधीच कुणाला कळत नाही..1
जगात आदि शब्द आई
बालमुखी महान शब्द आई !
ओथंबलेल्या शब्दातून जिव्हाळ्याने
जोजवित गाते अंगाई..2
नेत्र ज्योतीच्या प्रकाश स्नेही
अबोध बालपण अजाणता फुलते.
दो करांच्या झुल्यात अद्भूत
निरागस बालमन खुलते..3
अपत्याच्या कल्याणाची कळकळ
काळजात आईच्या असते
श्रद्धा भाव अपार विश्वास
मुलांसाठी ईश्वर आईच असते..4
बाळ औक्षवंत होऊ दे
ईश्वराला नित्य आळवत असते
जीवनात सार्या खस्ता
ईवल्या जीवांसाठी झेलत असते..5
आईच्या पदराच्या ऊबेत
आयुष्य पाकळ्या गंधून जाती
मुलांच्या महान कर्तृत्वाने
बाळंतकळा धन्य धन्य होती..6
आई हवी प्रत्येक जीवाला
आई पैशाने मिळत नाही.
आईची उणिव जीवनात
कधीच भरून निघत नाही..7
नाळेने जोडलेले नाते अतूट
अजोड अमूल्य अमाप असते.
आईच्या मातृभाव भावनेचे
मूल्य कधीच कळत नसते..8
मातेचे प्रेमाचे नाते अमृतमय
मातेचे स्थान महान असते.
अपत्यच्या हृदयी अलौकिक
मातृत्वाचे गान घुमत असते..9
संतती शिरी सदासर्वदा
आईचा प्रेमळ आशिर्वाद असतो.
आईविना या अफाट विश्वात
राजा ही रंक असतो..10
