साथ दे तू मला...
साथ दे तू मला...
पहाटेच्या गुलाबी थंडीत प्रेमाची ऊबदार चादर दिलीस..
अमावस्या रात्रीतही चांदण्यांची जणू रास बरसलीस..
क्षणात बदलून टाकलंस आयुष्य जगण्याची उमेद दिलीस..
दुःख निराशेने बुडलेल्या निशाला रातराणीचा सुगंध दिलास..
गर्दीत हरवल्या पामराला पुन्हा जगण्याची साथ दिलीस..
बेचव झाल्या सुरांना ही तुझ्या प्रेम गीतांनी छेडत गेलीस..
आयुष्यात ज्याची होती कमी ते सारे काही पदरात टाकलेस..
कोमेजलेल्या कळीला ही पुन्हा फुलण्याचे तू सामर्थ्य दिलेस..
काही उरलेच नाही आता मागण्यासारखे ...
खरंच ... न मागताच तू खूप काही दिलेस !
अस सगळं असतानाही आता मात्र तूच खचलीस..
दुःखाच्या डोहामध्ये मरणाची भाषा बोलू लागलीस..
असेल दुःख डोंगराएव्हढे धीर तुझा तू सोडू नको..
होईल सारं पहिल्यासारखा डाव अर्ध्यात मोडू नको..
कळेल त्याना कधीतरी ही तुझ्या अस्तित्वाची जाणीव..
घेतील तुला मायेने जवळी आणि भासेल तुझीच उणीव..
जशी तू होती माझ्या सोबत तशी सावली बनून राहीन..
सुख दुःखाच्या खेळपटावर बनून वजीर साथ मी देईन..
