यशाच शिखर
यशाच शिखर
*देव पहाहो देव पहा हॊ उंच ठायी उभे रहा हॊ!!*
प्रत्येक माणसाच्या जीवनात खाच खडगे असतातच कारण जितके दिवस तितक्या रात्री जितकं सुखं तितकं दुःखं हे ठरलेलंच आहे.
यां संसारात सुखं नसून सुखाभास आहे पण सुखं शोधलं पाहिजे पण सुखं काही मिळत नाही.
बर तेही कुठं शोधायचं ठिकाण सुद्धा माहित नाही कसं शोधायचं हेही माहित नाही बर सल्ला घ्यायला कोणाकडे जायच हेही माहित नाही सुखं बाहेर शोधायचं कां आत शोधायचं हेही माहित नाही. सुखं पैशाने मिळतं कां? कां अधिक कशाने मिळतं हे सुद्धा माहित नाही.सुखं मिळालं तर काय करायच हेही माहित नाही.
पण संत तुकाराम महाराज म्हणतात की सुखाचे गिर्हाईक सर्वच आहेत.कारण दुःखं हे कोणालाच नको आहे.
*"मजलागी दुःखं व्हावे*
*ऐसे कोणी ना भावे जीवे!!*
मला दुःखं व्हावं असं कोणालाच वाटतं नाही मग दुःखं हे जर कोणालाच नको आहे तर सुखं हे सर्वांना पुरेल कां? बर सर्वच योग्यतेचे आहेत कां? कारण
*प्रकारचे तीन,*
*तुका म्हणे केवले जन!!*
काही सात्विक तामसा तर काही राजस वृत्तीचे आहेत.
त्या मुळे सर्वच योग्यतेचे असणार कां दुखरूपी माल सर्वांना देता येईल कां? सर्वांना सुखं हे पचणी पडेलकां? कारण मनुष्याला सुखं मिळालं की तो आरामच करणार पण आराम जरी केला तरी त्याला सुखं पचणी पडणार नाही जगात असे बरेच आहेत की देरे हरि पलंगावरी पण नुसतं पलंगावर बसलं म्हणजे सुखं म्हणतावईल कां? पलंगावर जरी सर्वं आयत मिळालं तरी त्या पासून शरीराची हालचाल बंद झाली म्हणजे शारिरीक व्याधी कालांतराने वाढणारंच आहेत मग ते सुखं पैशाने मिळतं नाही आराम करण्याने मिळतं नाही पैसा कामावल्याने मिळतं बायका पोरा पासून सुखं नाही तर वनात गेलं तरी तिथे तरी सुखं मिळतं कां? सर्वं घरदार सोडून वनात गेल जप तप केला तरी सुखं मिळेल का? तर नाही कां तर पुढे मनाचा प्रश्न निर्माण होतो वना जाशी तेही वनिता चिंतीशी तरी तपची वाउगे होई रया!!जप तपात मन लागणे अवघड आहे बर वनात जाऊन तिथे हीं अगदी हिमालयात गेला तरी तुला सुखं मिळणारच नाही.
हिमावंतू दोष खाये परी जिवीत्वाची हानी होये!!हिमालयात जरी गेला तरी शरीराला दुःखं व्याधी आहेत
*"दुःखं दोषाणू दर्शनम्!!*
तिथेही दुःखाचे दर्शन होणारच मग करावं तरी काय? हा प्रश्न निर्माण होतो.
मग सुखरूपी माल आहे तरी कोठे तो शोधावा तर लागणारच आहे. पण कसा शोधणार?
इथे विचाराची उंची गाठल्या शिवाय सुखं मिळणार नाही. मग सुखं नाही कां? तर सुखं तर आहे पण मग मिळतं कां नाही? याचं उत्तर सुखं नाही असं नाही सुखं तर आहेच मग दिसतं कां नाही? याचं उत्तर एकच आहे सुखरूपी माल मिळण्यासाठी उंच विचाराचे ठिकाणी कुठेतरी उभं राहणं निश्चित आलं...!!
देव पहा हॊ देव पहाहो उंच ठायी उभे रहा हॊ!!
उंच ठिकाणी जाण्यासाठीही बरेच जन गेलेत पण उभं राहायच्या भानगळीत खोल दरीत जाऊन धप्पकन पडलेत.
एका कवीने दृष्टांत म्हणून एक कथा सांगितली की एक लहान मूल होतं? ते मुलं म्हणजे अगदी लहान की साधारण उभं राहण्याच्या दरमन गुढग्यावर रांगण्याच्या योग्यतेच होतं म्हणजे अगदी लहान वयाच होतं. त्या बद्दल कवी संतदासांनी एका कवितेत म्हटलं की,
*उंच स्थळासाठी कष्ट ते सोसावे|*
*तरीच पाहावे शिखंर ते!!२!!*
उंच शिखर गाथायच असेल तर दुःखं काही सहन हीं करावीच लागतील तरच उंच ठिकाणी गेल्याचा आनंद मिळतं असतो.
दगड धोंड्याच्या ठोकरा की चालण्याचा त्रास म्हणावा तो सहन करावाच लागणार आहे पण आपली अवस्था वेगळी असते आपल्याला सुखं आनंद पाहिजे पण उपडव्याप नको पाहिजे असते ते सहनच होतं नाही त्या साठी कवी संतदास म्हणतात की,
*यशाचे शिखर गाठतांना पहा|*
*आनंदित रहा समाधानी!!१!!*
यशाच शिखर गाथायच असेल तर सर्वात पाहिले आनंदित राहिलं पाहिजे.
*मन करा रे प्रसन्न!*
*सर्वं सिद्धीचे कारण!!*
तस उंच शिखर गाथायच असेल तर प्रसन्नचित्त राहीलच पाहिजे हा पाहिला गुण होय.जसे की,....
कवी संतदास उदाहरण देतात की,
*सानुले बालक नं घेई आधार*
*नं फिरे माघार गेल्याविना!!३!!*
लहान मुलं ते उभं राहण्या साठी धडपड करतांना पडतेच पण त्याची फिकीरच करीत नाही तेव्हाच ते उभं राहू शकत त्याच प्रमाणे जिना चढत चढत ektc🎂वर जातंय तेव्हा ते एकटं पुढे जाऊन जेव्हा वरचा टप्पा गाठून आपल्या पेक्षा जेव्हा उंच जाते तेव्हा त्याला नक्कीच आनंदाला पारावार राहत नाही खरा आनंदाने वर जाऊन नाचायला हसायला लागत कां तर त्याला खरा आनंद झालेला असतो तो जे जिना चढतांना पडला असेल गुढगे रांगताना दुखलेही असतील पण वर चढल्याचा आनंद व्यक्त करतो पण दुःखं कधीचसांगत नाही.
तस ज्याला मोठं व्हायचं आहे इंच ठिकाणी जायच आहे त्यांनी दुःखं सांगनं व्यर्थ आहे जो दुःखं धरून बसतो तो सुखाची अपेक्षा करणं हे त्याच्यासाठी फार चुकीचं ठरेल.
कारण......
*जया मोठेपण यातना कठीण*
*सोशीता ते जाण सर्वं मिळे!!४!!*
ज्याला जीवनात मोठं व्हायचं आहे त्याला दुःखं सहन करावंच लागेल.
*जया अंगी मोठे पण*
*तया यातना कठीण!!*
मोठं व्हायचं असेल तर यातना भिगल्या शिवाय मनुष्य मोठा होऊच शकत नाही.
*सोशीता ते जाण सर्वं मिळे!!४!!*
त्या यातना सोसल्या की तो उंच ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही.म्हणून संतदास म्हणतात की.....!!
*संतदास म्हणे कष्टाविना काही*
*सुखं ते नं पाही मनुष्य तो !!५!!*
संतदास म्हणतात की कष्टशिवाय सुखं नाही रात्री शिवाय कधीच दिवसाचा सूर्य उगवत नाही जीवनाची पहाट कधीच होतं नाही.श्रमाशिवाय आरामाला कधीच किंमत येत नाही.
तस उंच विचारावर आरूढ होऊन उंच ठिकाणी उभराहल्या शिवाय पर्याय नाही तरच तो मनुष्य उंच ठिकाणचा देव पाहू शकत नाहीआणि देव पहिल्या शिवाय सुखरूपी माल कधीच मिळतं नाही.
नदीच पाणी खाच खडगे खात खातच समुद्राला मिळते तस प्रत्येकांनी सुखाची अपेक्षा करतांना दुःखं सहन करीतच सुखं आपलंस करावं लागतं.
*स्त्रियेचे राहुळे उघडीतू*
*जगाचे आंध्य फेडितु*
*निघे जैसा भास्वतु*
*प्रदक्षिने!!*
सूर्य जसा लक्ष्मीच निवास असलेलं कमळ फुलवत जातो. जगाला प्रकाश देत जातो.
पण आपली प्रदक्षणा पूर्ण करीत असतो तस मनुष्याने आपल्या आल्या जन्मात इतरांना सुखं देत देत इतरांना हसवत हसवत आपली यां जन्मा पासून तर मारे पर्यंत विश्व प्रदक्षणा पूर्ण करावी तरच सर्वस्वी आनंद किंबहुणा सुखानंद त्याला मिळाल्या शिवाय राहणार नाही लोक त्याला आपल्या सद्गुनाने देव मान्य संताची उपमा देतात तेव्हा खरच तो देवरूप होऊन जातो आणि सर्वं सुखाचा अनुभव घेत असतो.
*देव ते संत देव ते संत*
*निमित्त त्या प्रतिमा!!*
हे अश्या प्रकारचं सुखच त्याला अनुभवत.
*मग सर्वं सुखाचे अगर म्हणे नरहरी सोनार!!*
*सर्वं सुखाचे आगर बापरखुमादेवीवर!!*
यां नित्य शाश्वत सुखाचा अनुभव तो स्वतः करतो आणि इतरांना हीं तो सुखं रुपी माल देण्याची क्षमता त्याच्यात आल्या शिवाय राहात नाही.
