यश चिमण्यांचे
यश चिमण्यांचे
एक छोटेसे शहर होते. त्या शहराच्या लगत एका मानवी जोडप्याने नवीन घर बांधायला सुरुवात केली. पण ते घर बांधत असताना एका चिमणीचे जोडपे एकटक लाऊन त्या घराकडे पाहत होते. पाहता पाहता ते आलिशान घर पूर्णपणे बांधून तयार झाले आणि त्या नवीन घरात घरात मानवी जोडपे राहण्यास आले. मानवी जोडप्याच्या गृहप्रवेशासोबात चिमण्याचे जोडपेसुद्धा नवीन घरात राहण्यासाठी गेले.
चिमण्यांनी घरात जाऊन सर्वप्रथम आपल्या आवडीची जागा हेरली आणि लगेच घरटे बांधण्यास सुरुवात केली. चिमणीचे घरटे नवीन घरात होत असलेलं पाहून मानवी जोडप्यांना त्यांचा खूप राग आला. त्यांनी चिमण्याचे घरटे क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकले ,आणि त्या चिमण्याच्या जोडप्याला घराबाहेर हुसकावून लावले. पण चिमणा चिमणीचे जोडपे काही तेथून जाण्यास तयारच नव्हते. परत ते छोटेछोटे काड्या, गवत जमा करून घरटे बांधण्यास सुरुवात केली. परत त्या निर्दयी माणसाला चिमण्यांचा राग आला आणि त्यांचे घरटे एका क्षणात मोडून टाकले. आणि तो दरडावून चिमण्यांना म्हणाला की "हे आमचं घर आहे तुम्ही येथून लगेच चालते व्हा."
चिमणा आणि चिमणीला त्या मानवाचा खूप राग आला आणि ते देखील रागाने म्हणाले "कुणाचं घर" ,?
माणूस त्वेषाने म्हणाला " हे माझे घर आहे माझे".
चिमणी म्हणाली "व्वा रे व्वा शहाणा ! तुझे घर कसे ?
माणूस रागाने "ही जागा माझी, हे घर माझे " तुम्ही चालते व्हा माझ्या घरातून ".
चिमणा म्हणाला " व्वा रे व्वा ! हे घर जसे तुझे आहे तसे हे माझेही आहे."
माणूस रागाने म्हणाला " का आणि कशावरून " ?
चिमणी म्हणाली " तू नवीन घर बांधलस "?
माणूस म्हणाला " हो ".
चिमणा म्हणाला " घर बांधताना या जागेवर काय होते ? "
माणूस " इथे भरपूर झाडे होती .
चिमणी म्हणाली " मग ती झाडे कोणी तोडली ?
माणूस म्हणाला " आम्ही तोडली ".
चिमणी म्हणाली " झाड तोडताना झाडावर काय होते ?
माणूस चाचरत म्हणाला " झा.झा..झा..डावर घरटे होती.
चिमणी म्हणाली ."झाड तोडताना त्या घरट्टयाचा विचार कधी केला का ?
माणूस म्हणाला "..... नाही ".
चिमणी म्हणाली " आज तू नवीन घर बांधलस पण आमचे घरटे उध्वस्त करूनच ना ! ".
माणसांला आपली चूक हळू हळू कळू लागली. आणि तो काही क्षणापुरती ...गोंधळला आणि... निःशब्द झाला.
चिमणी म्हणाली " अरे बोल ना ! आमचं संसार उध्वस्त केलस , आमच्या मिञ परीवरांना दूर केलस . पण आम्हाला तुझ्या एवढ्या मोठ्या घरात छोटीसी जागा देने तुला किती अवघड जात आहे.
मानवी जोडपे ......परत निःशब्द... मान खाली.!
चिमणा म्हणाला " वृक्षवल्ली आम्हा सोयरे ! वनचरे ! ही साधूसंतांची शिकवण लवकरच विसरलात का ?
माणूस म्हणाला "आम्हाला माफ करा चिमण्यांनो आम्हाला माफ करा" ...आम्ही चुकलो.
चिमणी म्हणाली " तुमच्या छोट्या छोट्या चुकीमुळे आमच्या पक्षांची प्रजात संपुष्टात येत आहे त्याच काय .?
माणूस म्हणाला. "हो हो तुमचे म्हणणे सर्व खरे आहे. आता हात जोडतो मी तुमच्यासमोर .शब्दाने आमच्या हृदयावर वार नका करू.
चिमणा म्हणाला ." मानवा तुम्हाला हृद्य नावाची वस्तू तरी आहे का ?
माणूस म्हणाला " आता बस करा चिमण्यांनो ! "स्वार्थात आम्ही पूर्णतः दृष्टिहीन झालो होतो . आमचे अस्तित्व उभारण्याकरिता आम्ही तुमचे अस्तित्व धोक्यात घालत होतो.
चिमणी म्हणली " मानवा तुम्हाला तुमची चूक कळली हेच मोठे प्रायचीत आहे तुमचे.
माणूस म्हणाला "चला चिमण्यांनो आता आपल्या घरात ! हे घर आमचे नसून तुमचे सुद्धा आहे.
चिमणी म्हणाली " खरंच म्हणत आहात का ?
माणूस म्हणाला " हो हो खरंच ! या घरात तूम्ही कुठेही घरटे करा. आमची कसलीच तक्रार नाही.
चिमणा चिमणी म्हणाले " माणसांनो "आम्हाला तुमच्या बांधलेल्या घरासोबत तुमच्या मनातील गाभाऱ्यात सुद्धा थोडेसे स्थान द्या ." सोबत झाडे लावा ,झाडे जगवा ! जेणेकरून आमचं आस्तित्व ,आणि प्रजाती कायम टिकून राहील.
माणूस म्हणाला " नक्कीच चिमण्यांनो ! झाडे लावूया आता प्रत्येकाच्या दारोदारी , तुमचे अस्तित्व वाचवणे हीच आमची सर्वात मोठी जिम्मेदारी !_
चला चला चिमण्यांनो आता आपण सारे मिळून या नवीन घरात नव्या युगाची सुरुवात करू या.
(असे म्हणून चिमण्यांचे जोडपे आणि मानवीय जोडपे आनंदाने त्या घरात राहू लागले).