Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Swarup Sawant

Others


3  

Swarup Sawant

Others


वर्क फॉर्म होम

वर्क फॉर्म होम

2 mins 7.1K 2 mins 7.1K

मुलगी माहेरी आली. मी तिला विचारले अग जावई कसे आहेत? ती म्हणाली, "बरे आहेत". अग आले का नाहीत. सुट्टी नाही का? तर म्हणते, "नाही ग घरीच आहेत. वर्क फॉर्म होम करत आहेत. बरे ते ग ट्रेन ची दगदग नाही .घरी आरामात बसून काम करू शकतात. लॅपटॉप वरच तर काम करायचे आहे. " खूप छान आयडीया आहे ग . "हो ना" ती म्हणाली

काही बायका तर गरोदरपणी बरेच दिवस असे घरून काम करतात. नविन कनसेप्ट आहे ग .वीज पाणी वाचवा. टेक्नॉलॉजी ची कमाल.

ऐकून खूप बरे वाटले .माणूस स्वतः च्या घरात निवांत बसून काम करू शकतो

मी विचारात पडले. बरीच दशके मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे

दिवाळी सुट्टी ही आम्हाला आधी एकवीस दिवस असायची . आत्ता पंधरा दिवस. सुट्टिच्या आधल्या दिवशी शाळेतून बाहेर पडताना प्रगतिपुस्तके , पेपर चे गठ्ठे, गुणपत्रक वही , टाचण वही असा विविध प्रकारचा फराळ घेऊन घरी येतो. घरच्या खमंग फराळाबरोबर शाळेचे काम शांतचित्ताने करत असतो .हे ही वर्क फॉर्म होमच झाले की .अरे मग आम्ही शिक्षक पुढेच की. अन् आता साईट ओपन झाली की आॉनलाईन मार्क भरतोच की?

गणपती सुट्टी त्याहून कमी दिवसाची. त्यात आता आठवडी पेपर तपासायची आहेच की ?

नंतरची सुट्टी मे जून ची .एप्रिल महिन्यात कामांची खडाजंगी

विद्यार्थी प्रवेशासाठी पालकांसोबत आखणी, फक्त कागदोपत्री नाही तर आॉनलाईन कामे पुढील वर्षाचे हजेरीपत्रक जात जन्मतारीख पडताळणी वर्षभराचे एकत्रीकरण आता हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी सबमिशन जातीनिहाय टक्केवारी असे बरेच प्रकार कॉलेजची मुले जसे रांग लावून टिकमार्क करून सबमिशन करतात ना तसे सबमिशन. शेवटी फी हिशोब .हुश्श सगळे झाले की तो म्हणतो कधी ईथून पळतो. कारण त्यावेळी बाहेर वातावरण ही गरमच असते ना राव!

मग शिक्षक सभा पुढील वर्षीचा वर्ग मनात परत सर्व कामे नाचू लागतात. सुट्टित जमले तर वेळापत्रक , वार्षिक नियोजन ,वर्गमंत्रिमंडळ, कार्यक्रम मासिक नियोजन आणी येणारा वर्ग कसा आपली भूमिका याची कच्चा आराखडा .

खरेच विद्यार्थांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून कामांची सार्थकता मानणारा हा शिक्षक तर फार आधीपासून टेक्नोसेव्ही आहे . बरीच वर्षे तो वर्क फॉर्म होम करत आहे. न चुकता आनंदाने.फक्त तो आधी हार्ड कॉपी करत असे आता तो बरोबरीने सॉप्ट कॉपीही करत आहे. हे न जाणणारा ,समजणारा म्हणतो ',अरे व्वा ! शिक्षक आहात भरपूर सुट्ट्या ! " शिक्षक ही मान हलवून कुठलीही तक्रार न करता हसतो बोलतो ,"हो ना."

शब्द खुंटलेले असतात. त्याची नाळ जिवंत बाळांच्या आयुष्याशी जोडलेली असते. इथे नो कॉम्प्रोमाईज . ती बाळे मोठी होतात . यशस्वी होतात .भेटतात बाई तुमच्यामुळे .असे म्हणतात तेव्हा 'वर्क फॉर्म होम"असो वा शाळेतील प्रत्यक्ष वर्क असो. एक वेगळेच समाधान देऊन जाते .उर वेगळ्या अभिमानाने भरून येतो. घाला सुट्ट्यांचे हिशोब अन्य कामांचे .या सारखे अपरेजल किंवा किताब कोणत्याच व्यवसायात नाही .

आम्ही कोण म्हणूनी काय पुसता?

शिक्षक आहोत सान बाळांचे.


Rate this content
Log in