STORYMIRROR

Ankita Mahulkar

Others

3  

Ankita Mahulkar

Others

वंध्यत्व ते आई होण्याचा प्रवास

वंध्यत्व ते आई होण्याचा प्रवास

3 mins
264

    नमस्कार माझ्या आईचे नाव" सौ. गौरी शंकर सिंगनापूरे" . "दिसायला सुंदर, प्रेमळ, अशी ही मूर्ती" . आई हा शब्द असा असतो ज्यात एक जादू असते. आईचे जेवढे कौतुक, गोडवे गायले ते आजन्म कमी असते. म्हणतात ना आई जर मुलाचे नशीब लिहायला लागली तर मुलांच्या जीवनात कधीही दुःख नसणार. मला कधीही राग आला, दुःख आले तर मी आई कडे बघते." एका क्षणात तीचा हसरा चेहरा बघून दुःख नाहीस होऊन जाते" . माझ्या आयुष्यात आई चे फार महत्व आहे. आज तीच्यामुळे मी आहे. मी धनवान, नशीबवान की ती माझी आई आहे. माझ्या आई बद्द्ल लिहिताना पानं कमी पडतील. पण आज मी तूम्हाला "एका अशा आईची गोष्ट सांगणार जी आई नसून एक आई असते". 

चला तर बघू या काय आहे या कथेत.... 

     बघता बघता आशा आणि सुधीरच्या लग्नाला 5 वर्षे झाली. अजूनही त्यांना मूलंबाळ नव्हती. म्हणतात ना एका स्त्री ला स्त्रीत्व तेव्हाच प्राप्त होते. जेव्हा ती एक आई होते. त्यातल्या त्यात वंध्यत्व हा स्त्री जन्माला असलेला अभिशाप असे लोकं बोलतात. आशा अजून पर्यंत आई झाली नव्हती पण मनातून ती आई केव्हाच झाली होती. "" तीचा वंध्यत्व ते आई होण्याचा प्रवास सुरू झाला होता".

  

 कितीतरी डॉक्टरांची ट्रीटमेन्ट, देवदर्शन, नामजप तप, अंधश्रध्दे सारख्या गोष्टी ती करुन चुकली होती. पण आतून ती खंबीर होती. तीची आई होण्याची धडपड सतत सुरू होती. आशाने आशा न सोडता ती पुढे जात होती कारण तीच्यात एक आई बसलेली होती. एकदा सुधीर आणि आशानी  मोठ्या तज्ञ डॉक्टरकडे जायचा विचार केला. डॉक्टरकडे जाउन काही अजून टेस्ट केल्या. रिपोर्ट बघून डॉक्टरानी सरळ सांगितल की तूमच कठीण दिसतयं. तुम्ही कधीही आई होऊ शकणार नाही. ईथे मात्र आशा आतून तुटली, दुखावल्या गेली होती तशीच जेव्हा आपल्या मुलांच वाईट झालेल बघून एक आई दुःखी होत असते......"डोळे पुसत ती खंबीरपणानी उठली...


   आशाची सुरु असलेली धडपड, तीला होत असलेला त्रास तसाच होता जेव्हा एक आई असाहय वेदना सोसून बाळाला जन्म देते. हळूहळू दिवस निघून जात होते.

"आई" होण्याची तीचे विचार सुरूच होते. रात्री ही ती जागत राहायची. जशी एखादी आई आपल्या बाळासाठी रात्रभर जागून अंगाई गात असते. यावरुन आई काय असते त्याची जाणिव होउन जाते.

     

आशाला होत असलेला त्रास हा कोणीही समजू शकत नव्हते . तीच्या चेहऱ्यावरचे हसू कमी झाले होते. हळूहळू ती जगापासून वेगळी होत जात होती. त्यात वरतून लोकांच्या टोमण्यांना ती सहन करत होती. कळत न कळत आई न होण्याच्या उदाहरणा मधे तीची गणना होत गेली. आता मात्र आशा अजून मजबूत झाली. तीने आपले वजन कमी करायचे ठरवले. "खाण्याची आवड असलेली आशा बाळ व्हाव म्हणून ती डायेट करु लागली. अनेकदा तीला आवडणारे काम सोडून फक्त आई होण्याकरता काय करता येईल तेच ती करू लागली... बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहतो. पण आशाच्या मनातल बाळ ५ वर्षा पासूनच होत. ईतकी प्रेम, माया तीच्या मनात होती. ज्या करीता ती प्रत्येक वेळेला त्याग करत होती. 


      न जाने देवाला पण आता दया आली असावी. न कळत "आशा एकदिवस प्रेग्नंट झाली" . तीच्या आनंदाला ठिकाणा नव्हता. ती सगळीकडे मिरवू लागली. हसू लागली." बघता बघता ९ महिने पूर्ण झाले पण आशा साठी ते ५ वर्षे ९ महिने होते" . "बाळ जन्माला आले" . आशानी बाळाला जवळ घेतले आणि लांब श्वास घेत ती ५ वर्षापासुन केलेली मेहनत आठवू लागली. तो नऊ महिन्याचा त्रास तीच्याकरता काहीच नव्हता. आता ती पूर्णपने बाळाचा सांभाळ करायला तयार होती." "आशाचा वंध्यत्व ते आई होण्याचा प्रवास पूर्ण झाला होता"". 

     आशासारख्या किती आया (आई) असतील अशा ज्या मनातून त्रास सहन करत राहतात. आई कशीही असो तीला महत्त्व, आदर द्या


   माझ्या आईकरिता दोन ओळी


  देवाच्या रुपात उभी

  संस्काराची तूच मूर्ती  

  आभाळाएवढी माया

  अगाध तुझीच किर्ती 🙏


Rate this content
Log in