विरह
विरह
1 min
9.2K
विरहाच्या हुंदक्यात जखमा झाल्या ओल्या
स्पंदनातील यातना श्वासा श्वासात दाटल्या.
घालमेल मनाची सांजवेळीचं वादळं साहवेना
सख्या आज एकाकी मन घायाळं.
तू माळलेला गजरा सुकल्या रे पाकळ्या
नजर प्रितीच्या वाटेवरी शोधते तुझ्या सावल्या.
कोंदणात विरहाच्या एकांती मन घेरलं व्याकुळ
मन आभाळ चिंब पापण्यात लपलं.