विरह
विरह
परत एकदा ट्रेन निघाली, स्टेशन सोडत असताना जोर जोऱ्यात
आक्रोश करत ..
आज माझ्या सोबत ती ही रडत होती बहुतेक,
विरहाच्या जाणिवेतून ।
वारा ही मला जोऱ्यात कापत जात होता
मला माघे सारण्याचा निरर्थक प्रयत्न होता त्याचा तो।
TC ला तिकीट दाखवलेला असताना ही तो तीनदा विचारून गेला,
मला ट्रेन मधुन खाली उतरवण्यासाठी कोणीतरी घुस दिली असावी त्याला ।
तेवढ्यात तिचा येणारा तो निरोपाचा फोन आणि गच्च भरलेला ट्रेन चा तो डबा ,
माझ्या डोळ्यातल्या पाण्यासाठीही जागा नव्हती त्या डब्यात ।
तरीही ना राहून एक खाऱ्या पाण्याचा थेंब बाहेर पडला, त्याने जीव देण्यासाठी उडी मारली खरी आणि गंमत काय तर थेट माझ्या शर्ट च्या खिश्यात जाऊन बसला ।
विरहा पासून मिलनाचे अंतर क्षणात पूर्ण केले त्याने ,
कारण त्याने जे पाहिले ते खूप सुंदर होते.....
" टाटा " करतानाची ती आणि " मनातल्या "ती मध्ये काहीच फरक नव्हता दोघीही सारख्या...
त्या इवल्याश्या थेंबाचे शब्द अजून कानावर रेंगाळत आहेत माझ्या ....
विसर तो दुरावा
विरह किती सहावा
शोधूनि तू तिला दंग ।
(जरा मनात बघ वेड्या)
तुझ्यात कोरिले तिने तिचे प्रतिबिंब ।
