विचार तरंग.....
विचार तरंग.....
आता विश्वासत्मके देवे
परिपाठ उरकत आला आणि एका मुलाने पसायदान शुरू करेंगे शुरू कर अशी आज्ञा दिली आणि पसायदान सुरू झालं
मुलं म्हणायला लागली आता विश्वासत्मके देवे येणे वाग्यद्ये तोषावे। तसं मी पोरांना म्हणालो, "अरे बाबानों विश्वासमके नाही रे! विश्वात्मके. अस रोज पंधरा दिवस चालल होत माझ्यातला गुरूजी गप्प बसत नव्हता अन पोरांच्या मनात म्हणा किंवा तोंडावर विश्वासत्मके पक्का झाला होता मी अंतर्मुख झालो अन मला वाटल माऊलींनी पसायदान लिहील त्यावेळी त्यांनी देवासमोर मागणे मागितले आहे विश्वरूपाने देवाने माझ्या या वाग् यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला प्रसादाचे दान द्यावे. दुष्ट लोकांचा दुष्टपणा जावा दुष्टांचे सत् कर्माकडे श्रध्दासहित प्रेम वाढावे आणि सर्व भूतमात्रांमध्ये आपला जीव आहे, अशा एेक्यभावाने विश्वबंधुत्व भाव निर्माण व्हावा. पण मला एक प्रश्न पडला की काय हरकत आहे आता विश्वासत्मके देवे अस पोरांनी म्हटल तर खर तर विश्वास पाहिजे तरच पसायदानाला अर्थ आहे कदाचित माऊलींना असंही म्हणायच असेल आता विश्वास आहे मला ह्या वाग् यज्ञाने देवा आपण संतुष्ट व्हाल.
भावार्थदिपीका या ग्रंथात माऊलींनी जीवनाचे सार सांगीतले आहे. अतिशय समर्पक शब्दात योग्य उदाहरणे दाखले देऊन भगवदगीता सामान्यातला सामान्य माणसाला समजेल अशा शब्दात आपल्या समोर मांडली आहे. अस म्हटल जात की ज्ञानेश्वर माउली नंतर समाधी नाही तुकारामानंतर वैकुंठ गमण नाही सर्वार्थाने हे खरं आहे जगतगुरू तुकोबारायांनी प्रपंच पाहून परमार्थ साधला ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय कमी वयात ज्ञानेश्वरी (भावार्थदिपीका) हा ग्रंथ लिहून जगत कल्याणाची ग्वाही त्यातून दिली. यांनी कधीही अस सांगीतल नाही की कामधंदा सोडून देवाजवळ बसा यांनी कधीही कुठेही अस सांगीतल नाही की देव नवसाला पावतो देवाला साकड घाला. यांनी कधीही अस सांगीतल नाही की देवाला सोन्यानाण्यांनी मढवा म्हणजे तुमच कल्याण होईल यांनी कधीही अस सांगीतल नाही की देवाला कौल लावा यांनी कधीही कुठही सांगीतल नाही की स्वार्थी लोभी बाबा बुवांच्या पायावर अक्कल गहाण ठेवा यांनी केल ते केवळ नित्य कर्म भगवंतावर नितांत श्रध्दा भगवंताला आपल्या अंतकरणात पुजल पूजेचे, भक्तीचे प्रदर्शन नाही मांडल. त्यांनी भगवंताला प्रत्येक जीवात बघितलं.निष्काम कर्म केल. नाहीतर आजकालचे बुवाबाबा त्या भगवंताच्या नावावर करोडो रूपयांची संपत्ती जमवून भोळ्या नाही नाही बावळट भक्तांना लुबाडत आहेत. माझा सांगणयाचा मुद्दाच हा आहे की" विश्वासत्मके " विश्वास ठेवा स्वतःच्या नित्य कर्मांवर ईश्वराला प्रत्येकाने आपआपल्या सोयीनुसार वाटून घेतल त्याला मूर्तीबध्द केल त्याच्या नावान व्यापार सुरू झाला ढोंगी पाखंडी बुवा बाबांचा. आता तरी जागे व्हा. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पहा तो आहे पण तो तुमच्या कर्मात आहे त्याची अनंत रूपे आहेत अनेक अवतारांमध्ये तो असतो. पृथ्वी आप तेज वायू प्रलय भूकंप ही त्याची विज्ञानवादी रूपे आहेत त्याच खर रूप कोणीही पाहीलेले नाही तो निराकार आहे अनंत आहे
विश्वास ठेवा तो आहे असणार आहे तुमच्या कर्मात प्रत्येक जीवात...
रामकृष्ण हरी
