व्हाट्स ऍप वरची श्रद्धांजली
व्हाट्स ऍप वरची श्रद्धांजली
माणसाच्या जीवनात किती ही प्रगती झाली तरी माणूस हा कधीही संतुष्ट न होणारा प्राणी .2008 साली जॅन कौम व ब्रेन एकटॉन ने आणलेल्या व्हाट्स अप हे अप्लिकेशन आज आपल्या जीवनातील अविभाज्य घटक झालं आहे. अन्न वस्त्र निवारा आणि व्हाट्स अप मला लागतच असच प्रत्येकाचं झालय आज. व्हाट्स अप म्हणजे काय चाललय शब्दातच अर्थ सांगणार हे ऍप आल्या आल्या सर्वांना मिळाले असे नाही. नव्याची नवलाई काही औरच असते. मग ती कोणतीही गोष्ट असो. लिहिता वाचता येणारे म्हणजे फक्त साक्षर असणारे लोकही हे ऍप आज अगदी सहज वापरत आहेत. सर्व गोष्टींची देवाण घेवाण व्हाट्स ऍप वर होते. मोठमोठे ग्रुप फॉर्म होवून लोक आनंद घेत आहेत या ऍपचा गप्पा गोष्टी मेसेजेस पोस्ट्स सर्व काही शेअर करतात मुख्य म्हणजे नको असलेल्या गोष्टी लगेच डिलीट करता येतात
प्रिया ही ह्या एपचा वापर करत होती आज रविवार होता रोज 5 वाजता उठणारी प्रिया आज 7 वाजता उठली
अंघोळ पूजा नाश्ता करून मुलांना व नवऱ्याला ही नाश्ता देऊन 9 वाजता जरा विसावली. जेवणाला लागण्याआधी जरा व्हाट्स एप पाहू, तिने मोबाईल हातात घेतला. व्हाट्स ऍप ओपन करून ती आधी माहेरचा फॅमिली कट्टा चेक करायची. कारण त्यावर सर्व माहेरच्या बातम्या कळायच्या... कोण आलं गेलं कोणाच काय झालं या बातम्या ताबडतोब समजायच्या आणि माहेर म्हंटल्यावर समजायलच हव्यात लवकरात लवकर. प्रिया ने फॅमिली कट्टा पहिला आणि तिला चुलत बहीण मनीषाचे सासरे गेल्याचे समजले. घटना पहाटे 5 ची होती अंत्यसंस्काराची वेळ संध्याकाळी 4 ची होती. काही मेम्बर्स नी व्हाट्स अप वरच श्रद्धांजली अर्पण केली होती. बरेच लोक आपली उपस्थित दर्शविण्यासाठी एखादा चांगला मेसेज निवडतात आणि तोच फॉरवर्ड करतात .पण प्रिया ला ती सवय नव्हती आपणही श्रद्धांजली अर्पण करावी म्हणून तिने मेसेज टाईप करायला सुरुवात केली.' दिवंगत शांताराम जाधव यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. ' आणि एक पुष्पगुच्छची इमोजी टाकून दिली.10 मिनीटांनी तिला तिच्या भावाच्या मुलीचा भाची गार्गीचा कॉल आला. "आत्या तुझा मेसेज दिवंगत शांताराम जाधव यांच्या आत्महत्येस शांती लाभो " असा झालाय आग मला माहिती आहे ती वर्ड आत्म्याला चा ऑटोमॅटिकली आत्महत्या झाला आहे पण अजून कोणी पाहण्याआधी डिलीट कर लवकर. प्रिया गोंधळली आणि मेसेज डिलीट फॉर एव्हरीवन न करता तिने डिलीट फॉर मी केलं. तिला आता अजून टेन्शन आलं. अरे बापरे! आता काय करू? ती स्वतः शीच विचार करू लागली. तिला अपराध्यासारख वाटू लागलं. तिने परत एक माफीचा मेसेज टाईप केला. परंतु मनाला रुखरुख लागून राहिली होती. तिने नवऱ्याला सांगितले तो बोलला अग होत अस कधीतरी माफीचा मेसेज टाकला ना झालं तर मग दे सोडून प्रिया अस्वस्थ होती. तिने मोठ्या अनिता ला बहिणीला कॉल केला आणि सांगू लागली. "ताई मनीषा चे सासरे वारले आणि श्रद्धांजली चा मेसेज टाकताना माझ्या हातून आत्म्याला शांती लाभू दे ते आत्महत्येस शांती लाभू दे झालं मी परत माफीचा मेसेज टाकला चुकून झालं म्हणून ."अनिता ने ते फोनवर व्यवस्थित ऐकले नाही आणि तिला वाटलं मानिषाच्या सासऱ्या नी आत्महत्या केली. तिनेही लगेच मेसेज टाकला आत हा मेसेज पूर्ण ग्रुपवर व्हायरल झाला. किती घाई असते लोकांना मेसेज फॉरवर्ड करण्याची 15।20 मिनिटात तो मेसेज सर्वांपर्यंत पोहचला होता. आता दिवंगत शांताराम जाधव यांचा नैसर्गिक मृत्यू आत्महत्या ठरला होता. प्रिया घाबरतच प्रेतावर जायला निघाली होती. तिच्या मनात गिल्ट होतच एकाने चूक केली दुसरा लगेच ती चूक फॉलो करतो जराही थांबत नाही. विचार करत नाही. प्रत्येकाला अपडेट राहण्याची घाई. आता काय होईल? पहिल्यांदा असा मेसेज कोणी टाकला याची चर्चा होईलच. प्रियाला संकोच वाटू लागला.तिचा माफीचा मेसेज टाकेपर्यंत आत्महत्येस शांती लाभो हा मेसेज 10 लोकांपर्यत गेला होता प्रिया मानिषाच्या घरी पोहचली रडारड सुरू होती. कुजबुज सुरू होती. आत्महत्या का केली कोणी तरी कोणाला तरी हळूच विचारत होत. गाववाले भावकी नातेवाईक बरीच मंडळी उपस्थित होती. गावचे कार्यकर्ते प्रेतावर यायला निघाले होते त्यांचीच सर्वजण वाट बघत होते.सर्व तयारी झाली होती. प्रेतावर आलेल्या प्रत्येकाला निघण्याची घाई होती. कधी एकदा बॉडी उचलतील आणि आपण निघू आपला संडे फुकट जायला नको हे चेहऱ्यावर दिसत होते. काहीजण हळूच घड्याळ बघत होते दुपारचे 3 वाजले होते. काहीजण कार्यकर्ते कुठपर्यंत आलेत याचा मागोवा घेत होते. काही जण हळूच व्हाट्स अप वर सुरू होते. बायकांचा आवाज कमी जास्त होत होता. एखादी जवळची नातेवाईक बाई आठवणींनी गहिवरून आले की जोरात रडत होती. त्यांच्या घरच्यांना असा काही मेसेज व्हाट्स ऍप वर व्हायरल झालाय याची कल्पनाच नव्हती. बायको लेकी सुना खूप रडत होत्या. कार्यकर्त्यांची गाडी 4 वाजता दारात येवून थडकली. सर्वांना हायस वाटले. लगबग सुरू झाली पुरुष मंडळी पुढच्या तयारी ला लागले. प्रेताला आंघोळ घालून झाली दोन शब्द बोलण्यासाठी कार्यकर्त्यामध्ये आलेले गावचे अध्यक्ष बोलू लागले. "येथे उपस्थित सगेसोयरे बंधू भगनिनो आज शांताराम दादा आपल्यातून निघून गेले पासष्ठ वर्षाचे आमचे दादा फार प्रेमळ होते. सकाळीच मला व्हाट्स ऍप वर मेसेज आला दादांनी आत्महत्या केली फार वाईट झाले ". हे शब्द ऐकल्यावर शांताराम जाधवांच्या घरच्यांना धक्काच बसला. त्यांचे रडू कुठल्या कुठे पळून गेले. त्यांचा मोठा मुलगा अध्यक्षांजवळ आला आणि म्हणाला "अहो तात्या काय बोलताय हे बाबा कशाला आत्महत्या करतील?" हार्ट अटॅक आला त्यांना. " प्रियाने हे ऐकलं आणि तिला त्या डेड बॉडीला परत अटॅक आल्यासारखे वाटले. तिला हुंदका आवरेना. माझ्या मूळे झालं हे सर्व अस तिला कळून चुकले होते सर्वजण कुजबुज करत होते ती मनातल्या मनात प्रेताची माफी मागत होती "नाना मला माफ करा चुकून झालं हे ती मनातच बोलत होती. " मग एक सुजाण व्यक्ती उभी राहिली आणि बोलू लागली "शांत रहा सर्वांनी चुकून कोणीतरी व्हाट्सएपवर मेसेज टाकला दि. शांताराम जाधव यांच्या आत्महत्येस शांती लाभो आणि हा मेसेज व्हायरल झाला. नातेवाईकांमध्ये तरी असे काही नाही दि.शांताराम जाधव यांचा मृत्यु हार्ट अटॅक ने झाला तरी हा गैरसमज दूर करावा ही विनंती. प्रियाची बहीण आणि भाची हळूच प्रिया कडे पाहू लागल्या. त्यांना हसू आलं होतं. प्रियाने नजरेनेच त्यांना गप्प बसण्याची खूण केली आणि प्रेताची पुन्हा एकदा मनःपूर्वक माफी मागून मोकळी झाली.