तू पाऊस....
तू पाऊस....
कधी कधी असं होतं नं आपल्याला भिजायचं नसतं अजिबात आणि अचानकच पाऊस येतो.ना तो रुतू पावसाळि असतो ना आपण तयार असतो.पावसाला मन नाही कळत फक्तं बरसणं कळतं.तो बरसतो चिंब भिजवतो आणि अलगद निघूनही जातो पण तो पाऊस अवकाळी असला तरी नको नको म्हणतांना आपण त्यात चिंब भिजलेले असतो आणि मनाला एक नविन पालवी फुटली असते.अलगदतच अोंजळीत घेतलेले ते थेंब हवे हवेसे वाटायला लागतात.क्षणभर का होईना सर्व मन नखशिखांत खोलवर भिजून गेलेलं असतं आणि पावसाला याची कल्पनाच नसते.कारण त्याचं काम असतं बरसनं आणि तो बरसून मोकळा झालेला असतो.कोण भिजतय कोण नाही याचं भानही नसतं त्याला.त्याला कळायला हवं असं अवकाळी बरसणं बरं नाही.अलगदतच जेव्हा कुणी अोंजळीत त्याला घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिथे पण थांबायचं नसतं.कधी कधी वाटतं तो अतृप्त आहे कधी वाटतं त्याला आवडतं असं अवकाळी येणं तर कधी वाटतं त्याचं अनावर दुख तो व्यक्तं करत आहे.तो ही अनभिज्ञ असतो आणि भिजणाराही .कितीतरी आठवणींना उजाळा देतो तो नकळतच आणि किती तरी पाणावलेले डोळे त्या पावसाचा आधार घेऊन पाझरलेले असतात.त्याचं येणं आणि अलगद निघून जाणं बरच काही घडलेलं असतं या छोट्याश्या अवधीत पण त्याला त्याची किंचीतही कल्पना नसते.जसं डोळ्यांच्या कळा पाणावतात ना तो आवरलेला थेंब तळ्यात मळ्यात करत असतो त्याला तो पाऊस हळूच मोकळं करतो अगदी सहज.तेव्हा त्या पावसाचा खुप आधार वाटतो .खुप सार्या भावनांना उधान आलं असतं ,मनावरची मळभ धुऊन निघाली असते आणि स्वप्नांना एक अंकुर येतं.स्वप्नांचा वेल मग गगणी जातो.मग माझी अोंजळ अगद तुला धरू पहाते पण तुला भेटायचं धरेला असते.हो ना?????म्हणून तू अलगद निसटून जातो हातातून आणि मी पण जाऊ देते कारण तुझ्या मुळे ती सुगंधीत होते ,बहरते ,मोहरते आणि तुझं तीच्यावर प्रेम आहे.माझं सुख तुझ्या सुखात आहे.मला तुझं येऊन चिंब भिजवून जाणंच पुरे आहे.थेंबा एवढं का होईना तु आला आणि मला माझी जाणिव करून दिली तुला अोजळीत घेण्याचं क्षणिक सुख पुरे आहे जगायला.बस बरसणं विसरू नको कारण मी जरी तुझी अपेक्षा करत नाही पण वाट बघत असते.
