Naveen Padmavati

Others

2  

Naveen Padmavati

Others

ट्रॅफिक पोलीस

ट्रॅफिक पोलीस

1 min
1.5K


दोन चाकीवरून एका वयस्कर गृहस्थासोबत येत असलेल्या वरुणने चौकात येईपर्यंत सिग्नलचा पिवळा दिवा पडल्यावरही पटकन गाडी चौकातून काढली आणि चौक पार करेपर्यंत लाल दिवा लागला होता. नेमकं तेव्हाच सिग्नलच्या पुढे उभं राहिलेल्या ट्रॅफिक पोलिसाने वरुणची गाडी आडवली.

"चल, ५०० ची पावती भर.लायसन्स दाखव." ट्रॅफिक पोलिसाने त्याचे लायसन्स काढून घेतले.

"अहो साहेब,स्पीडमध्ये असताना एकदम चौकात आल्यावर ग्रीन सिग्नल बंद होऊन यल्लो पडला."

"मग..पिवळा सिग्नलचा अर्थही 'गाडी थांबवायची' असा असतो, नियम शिकवू का आता.?."

"स्पीडमध्ये कंट्रोल झाला नसता साहेब, म्हणून ..."

"कारणं देऊ नकोस.५०० ची पावती कर."

"एवढे नाहीत साहेब ..हे दोनशे घ्या."

"हे तुझे वडील का? " वरुणने दिलेल्या शंभरच्या दोन नोटा खिशात ठेवता ठेवता ट्रॅफिक पोलिसाने गाडीवर मागे बसलेल्या गृहस्थाबद्दल विचारले.

"नाही,हे माझे कुणीच नाहीत...आता मागच्या चौकात स्टॉपजवळ भेटले.तिथे राजाराम पुलाकडे जायचंय असं कित्येकांना म्हणत होते...त्यांचं बोलणं पण नीट कोणाला कळेना आणि त्यांना नीट दृष्टी पण नाही..काहीजणांनी तर त्यांना भिकारी समजून पैसे दिले ..मी त्यांच्याबरोबर बोलल्यावर मला म्हणाले,पुलावर माझा लेक मला न्यायला येणार आहे...खरंच त्यांचा मुलगा तिथे आला असेल का नाही काय माहित? पण तिथेपर्यंत त्यांना नेऊन तिथली परिस्थिती तरी बघतो.." वरूणच्या मागे बसलेला गृहस्थ विश्वासाने वरूणच्या पाठीवर हात ठेऊन बसला होता.

"बरं जा,हे घे..." असं म्हणून ट्रॅफिक पोलिसाने वरुणचे २०० रुपये परत त्याच्या हातात टेकवले.


Rate this content
Log in