Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Radha Oka

Others

5.0  

Radha Oka

Others

टिक टिक वाजणार घड्याळ........

टिक टिक वाजणार घड्याळ........

3 mins
807


सकाळी उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत आपली प्रत्येक गोष्ट घडाळ्याच्या काट्यावर सुरु असते. सकाळचा गजरा पासून सुरवात होते. घर लहान असो किंवा मोठं प्रत्येक खोली मध्ये एक तरी घड्याळ असतंच. आपण शाळेत असताना "अग उठ ७ वाजले शाळेची वेळ झाली" इथं पासून आईची घड्याळाच्या काट्याची वरची कसरत सुरु व्हायची. बाबांची "गाडी चुकू नये म्हणून ५ ला उठतो पण त्या गडबडीत असलो तरी सकाळी ६ चा ठोक्याला जाताना एकदा परत मला चहा लागतोच" हे मित्रांसमोर काढलेले उद्गार अनेकदा आपल्याला ऐकायला मिळायचे. आजोबांची वेगळीच धावपळ असायची ती सकाळचा पेपर ची. "आज ७ वाजले तरी हा पेपर वाला कसा नाही आला" म्हणून दारात उभं राहायचे त्याचा स्वागताला. आज्जीची आपली ४ लाच सकाळ व्हायची. दार पडणारी प्राजक्ताची फुल वेचून देव पूजेची तयारीत ती मग्न असायची. कॉलेज असो व शाळा घड्याळच महत्व सगळ्यात जास्त परीक्षेचा वेळी कळायचं. एक एक काटा पुढे सरकायचा तशी जीवाची घालमेल वाढत जायची. "आमच अगदी घड्याळाच्या काट्यावर सगळं चालत हां" असा सगळ्यांना सांगणाऱ्या कुलकर्णी काकू दुपारी २ ला कुकर लावायचा तेव्हा फार हसू यायचं.  घड्याळ्यातल्या प्रत्येक तासाला  वेगळं महत्व असायचं. दुपारचा ४ ला चहा, संध्याकाळचा ७ ला दिवा लावणी, रविवारी सकाळी रंगोली, ९ वाजता महाभारत हे अगदी ठरलेलं असायचं. 

 

वर्षानुवर्ष न दमता आपल्या साठी हे घड्याळ आपल्या बरोबर आपण जाऊ तिथे चालत आल. एखादे वेळी बंद पडलं तर जणू कि आपलंच आयुष्य थांबलं अशा अविर्भावाने आपण त्यात सेल घालतो. बंद पडलेले घड्याळपण दिवसातून २ दा योग्य वेळ दाखवत. आनंदाच्या क्षणी भराभर पळत. वेळ कसा जातो कळत नाही.  पण हेच कोणाची तरी वाट पाहताना किंवा दुःखाचा क्षणी मात्र वेळ जाताजात नाही. लहान पणी आई सांगायची प्रत्येक गोष्ट वेळेवर होण्याला महत्व आहे. त्या वेळेची किंमत तेव्हा कधी कळायची नाही पण बाहेरचा जगात गेल्या वर एक एक सेकंदाची किंमत आपोआप कळत गेली. पूर्वी लग्नात ठरलेला आहेर असायचा नवऱ्याला मुलाला किंवा मुलीला अजिंटाच घड्याळ. त्या घड्याळानी चांगले वाईट अनेक क्षण दाखवले. पण कधी थांबलं नाही. ते पुढे चालत राहील नवीन आशेने आणि नवीन ऊर्जेने. 

 

माणसाचं आयुष्य घड्याळ्याच्या काट्यावर पळायला लागलं तेव्हा पासून आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा विसर पडायला लागला. रविवारी एकत्र बसून दुपारी दूरदर्शन वरचा एखादा सिनेमा एकत्र पाहण्याची गम्मत संपली आणि ती जागा weekend relaxation ने घेतली. सुट्टीचा दिवशी आई सकाळी ९ ला डोक्याला चपचपून तेल लावायची आणि ११ ला अंघोळ घालताना "माझा बाळाला दृष्ट नको लागू दे!" म्हणून ओवळून टाकलेलं पाणी काळानुसार आटून गेलं. घड्याळ्याच्या त्या गजराचा कर्कश्श आवाजाची जागा आता मोबाइलला मधल्या हळुवार वाजणाऱ्या अलार्म टोन ने घेतली. त्या गजराच्या आवाजाने बऱ्याचदा आजूबाजूचे पण उठायचे पण आता snooze चा option आला आणि गजराच्या एका ठोक्यात उठणारे आपण दर ५ मिनिटाने अलार्म बंद करत असतो. वेळ नाही, जमत नाही, काम खूप आहे चा नावाखाली आता मात्र आपल्याला कोणाकडे यायला जायला वेळ नसतो. जेवायला हि वेळ नाही मिळत अस म्हणणारे तासतासभर फोन वर मात्र बोलताना दिसतात. सणावाराला एकत्र भेटायची मजा आता जोडून सुट्टी आली  म्हणून आता फॅमिली बरोबर बाहेर फिरायला जाण्यात जास्त वाटते. आनंदाचा क्षणी जाऊ दे पण साधं माणूस गेलेल्या क्षणी देखील ऑफिस मधून सुट्टी नाही मिळत म्हणून सांगणारे नंतर ४ दिवस बाहेर फिरायला जातात तेव्हा कळत कि घड्याळातल्या वेळेपेक्षा पण माणसंवर किती लाचार वेळ आलीय. टिक टिक वाजणार घड्याळ काळा नुसार अडगळीत जाऊन पडलं पण माणसावर येणारी वेळ थांबत नाही. घड्याळ्याच्या गजरा वर जसे खडबडून जागे व्हायचो तस वेळीच जागे नाही झालो तर आत्ता आपली वाटणारी माणसं कधी लांब जातील आणि आपण एकटे पडू ते कळणारहि नाही. घड्याळ भिंतीवरच असो व हातातला वेळेचं महत्व वेळीच कळलं नाही तर वेळ कधी निघून गेली हे कळणार हि नाही.


Rate this content
Log in