Eknath Gofane

Others

1.9  

Eknath Gofane

Others

ती येनारच

ती येनारच

3 mins
2.5K


पिपळाच्या वट्यावर ,मबाईल मंदी फिरवा फिरव करत दामु गुर्जी अन चंदू मास्तर गप्पा करत बसले होते... ऊन वाढत होतं .. पिपळाच्या गार सावलीत पाखरं गप होती... रामू नानाच्या आंब्यावर फक्त कोकीळ चा आवाज येत व्हता...

गब्याच्या ' डिजिटल केस & फेस सेटींग' सेंटर या टपरी खालच्या गटारीत उन्हापासून संरक्षण म्हणून चिंधू आत्याचं झामरं कुत्रं ३ डुकरांशी युती करुन नैसर्गिक ए.सी . चा आनंद घेत झोपलं होतं...इकडे पिपळाच्या वट्यावर ,मबाईल मंदी फिरवा फिरव करत दामु गुर्जी चंदू मास्तरला

"गुर्जी दम धरा ,ती येनारच "असा जोरात बिडी ओढावी एवढा आत्मविश्वास देत होते...

"गुर्जी दम धरा ,ती येनारच " हे दामु गुर्जीचे शब्द ऐकून वट्टयाच्या फरशीवर 'गोणपाट ' टाकून झोपलेले माजी सरपंच नामदेव भाऊ ' डोकोमो ' वाले जागे झाले...पन संशय येऊ नये म्हणून

चिंधू आत्याच्या झामऱ्या कुत्र्यागत डोळे 'क्लोज ' व

कान ' ओपन ' करुन ढोंगी पनाचा 'संगम ' खेळू लागले...चंदू मास्तर दामु गुर्जीला म्हणले, '' तुम्ही म्हणताय ,गुर्जी दम धरा ,ती येनारच "मंग त्या दिवशी पन ती आल्ती ना? "

दामु गुर्जी .... मंग तिचं काय झालं?

"आहो चंदू मास्तर, ती बोगस व्हती. खोटी व्हती.कोनीतरी उचापती करुन धाडली व्हती तिला ,सनवारी "....

दामू गुर्जी चे "कोनीतरी उचापती करुन धाडली व्हती तिला ,सनवारी " .....

हे शब्द ऐकून ,फरशीवर 'गोणपाट ' टाकून झोपलेले माजी सरपंच नामदेव भाऊ ' डोकोमो ' वाले यांचं डोकं जास्ती चालाया लागलं,आपल्या बंद डोळ्यात भूतकाळ आठवत ते मनाशी म्हनाले,

दामु गुर्जी चंदू मास्तरला म्या , ईस वरसा पासून वळखा तोय , दोघं १० वरीस आपल्या वाह्याच्या अन १० वरीस आपल्या

मोठ्या साडूच्या गावात नोकरीला होते... तिथं एकदम इमानदार नोकरी केली.. त्यांनी घडविलेले पोट्टे आज मामलेदार , डेस्पी, इंजीनेर, वकील, हेडमास्तर, डॉक्टर तर काही पोरी क्रिडापटू, शास्त्रज्ञ , गायिका , सरपंच, नगराध्यक्ष हायेत...अन आज अचानक ' गुर्जी दम धरा , ती येनारच,त्या दिवशी पन ती आल्ती,

ती बोगस व्हती ,

खोटी व्हती ,कोनीतरी उचापती करुन धाडली व्हती तिला, शनवारी ',असं दोन्ही गुर्जी का मनातय?

गुर्जी सैराट होनार की काय ?गुर्जींनी कुठं काही ' गोणपाट ' चा गठ्ठा पाहिला की काय?

असे अनेक प्रश्न , ' फरशीवर गोणपाट टाकून झोपेचं सोंग घेतलेल्या माजी सरपंच नामदेव भाऊच्या मनात उठले...गुर्जींना विचारावं , अन सत्य बाहेर काढावं , म्हणून त्यांनी आपले डोळे ओपन केले. पिपळाच्या वट्यावर ,मबाईल मंदी फिरवा फिरव करत दामु गुर्जी अन चंदू मास्तर गप्पा करत बसले होते , तिथे दोघांच्या मध्ये आले, अन म्हनाले,

"म्या , तुम्हास्नी,ईस वरसा पासून वळखतोय , तुम्ही एकदम इमानदार नोकरी केली. पण आताच या वयात ' लोच्या ' का? मला खरं सांगा, म्या पाच पोरं , सहा सुना , १० नातवंड अन एका बायकोची शप्पथ खाऊन सांगतो,

गावात कोनालाच सांगनार नाय,कोनाची वाट पाहताय, दोघांपैकी ' खरा ' सैराट कोनाचा हे सांगा "

नामदेव भाऊ च्या प्रश्नाने दोन्ही गुर्जींचं टेन्शन वाढलं,ही काय भानगड असा प्रश्न पडला...

' दुष्काळात लागलेला ' धोंडा ' त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता ..

इतक्यात नामदेव भाऊ पुन्हा बोलला, "मला खरं सांगा, म्या पाच पोरं , सहा सुना , १० नातवंड अन एका बायकोची शप्पथ खाऊन सांगतो,

गावात कोनालाच सांगनार नाय "चंदू मास्तर म्हनाले, " कशाचं काय " ?

नामदेव भाऊ सांगू लागले, " ती येनारच, त्या दिवशी पन ती आल्ती, ती बोगस व्हती ,

खोटी व्हती ,कोनीतरी उचापती करुन धाडली व्हती तिला, सनवारी "

ही कोन ते सांगा ,शप्पथ खाऊन सांगतो,

गावात कोनालाच सांगनार नाय ." दोन्ही गुर्जींना,नामदेव भाऊच्या ' डोक्याच्या गल्लीतील गोंधळाचा ' उलगडा झाला....अन , दामू गुर्जी बोलले,

''आहो नामदेव भाऊ , आमचा लोच्या नाई की सैराट नाही, बदली बाबत what's app वर पोस्ट येते याबद्दल बोलतोय " असं सांगून

दामू गुर्जी जीआर बद्दल सांगू लागले...

संवर्गनिहाय घोळाने , नामदेव भाऊचं डोकं गरगराया लागलं..

नामदेव भाऊ , आपलं गोणपाट घेऊन घराकडे निघाले... बदली होते का बदली घोटाळा होतो हा विचार डोक्यात घेऊन.

इकडे ऊन कमी झालं होतं .. पिपळाच्या गार सावलीत पाखरं चिवचिवाट करत होती... रामू नानाच्या आंब्यावर फक्त कोकीळ चा आवाज आता जोरात येत व्हता...

गब्याच्या ' *डिजिटल केस & फेस सेटींग*' सेंटर

या टपरी खालच्या गटारीतलं चिंधू आत्याच्या झामऱ्या कुत्र्यानं परत डुकरांशी युती तोडण्याची भाषा केली.इकडे पिपळाच्या वट्यावर ,मबाईल मंदी फिरवा फिरव करत दामु गुर्जी चंदू मास्तरला

"गुर्जी दम धरा ,ती येनारच "आपली बदली होनारच

असा जोरात बिडी ओढावी एवढा आत्मविश्वास देत होते...


Rate this content
Log in

More marathi story from Eknath Gofane