तिचं मन
तिचं मन
विशाखा आज ठरवूनच टाकते की स्वतःसाठी दिवसभरातून एक तासाचा वेळ तरी काढायचा कारण तिला बरेच दिवस पासून वाटत असते की आपण स्वतःला मोकळेपणाने आरशात न्याहाळलेच नाही आपल्या आवडत्या गोष्टीसाठी मोकळेपणाने वेळ दिलाच नाही त्यानुसार मग ती कामाची नियोजन करून अट्टाहास धरते त्या मोकळ्या वेळेचा.
एक मध्यमवर्ग कुटुंबातले विशाखा जबाबदारीने मुलांच्या आणि मिस्टरांच्या वेळेमध्ये स्वतःला नेहमी गुंतवणूक टाकते त्यामुळे स्वतःच असं काही अस्तित्व आणि आवडीनिवडी आहेत आणि त्या जपाव्यात याचा तिला विसर पडला होता
भल्या पहाटेच सकाळी चार वाजता तिच्या दिवसाची सुरुवात होते मिस्टरांच्या दुपारच्या जेवणाच्या डब्याची तयारी सोबतच नाष्टा आणि चहा हे सगळं सहाच्या आधी तिला तयार करायचं असतं त्यामुळे ठरल्याप्रमाणे नेहमीची पहाट तिची स्वयंपाक घरापासूनच सुरुवात होते मिस्टर घरा बाहेर पडले की मुलांच्या शाळेची लगबग सुरू होते शाळेची बस येईपर्यंत मुलांना टापटीप तयार करून त्यांच्या आवडते खाऊचे डबे तयार करून ती वेळेतच सात वाजेपर्यंत मुलांना शाळेच्या बसमध्ये चढवते
स्वतःसाठी चहा मांडत किचनचा पसारा आवरते आणि चहाचा घोट घेत उर्वरित कामाचे नियोजन लावते कपड्यांच्या पसारा आवरण्यापासून तर इस्त्री चे कपडे नीट कपाटात ठेवण्यापर्यंत घरातले केर काढण्या तर नित्यनेमाची पूजा करेपर्यंत तिचा सकाळचा बहुतेक सा वेळ निघून जातो सकाळची कधी दुपार होते तिला कळतच नाही त्यातच वाण सामानाची यादी भाजीपाला घरात आणण्याची जबाबदारी अत्यंत न चुकता चोखपणे पार पाडते
मुले शाळेतून घरी आले की नुसती दंगा करतात अगदी एखाद्या जेलमधून सुटल्यासारखी व तिने नुकतेच आवरलेले घर पसरून ठेवतात बालपण असते काय उगाच रागवायचा त्यांना म्हणून ती त्यांना त्यांच्या पद्धतीने दंगामस्ती करू देते खरं खेळण्यातच वय असतं ते बालपण
संध्याकाळ होतास रात्रीच्या जेवणाची लगबग सुरू होते मिस्टर घरी येईपर्यंत हवे सगळेच जेवण तयार असायला हवे असते संध्याकाळची दिवे लागली की ती मुलांची शुभम करोति करून घेते स्वयंपाक तयार झाला की सगळे मिळून एकत्र जेवतात पुन्हा आवरसावर आणि सकाळच्या डब्याची थोडी मोजकी तयारी करून सगळेजण झोपायला जातात
या सगळ्यात दिनक्रमांमध्ये स्वतःसाठी एक तासाचा निदान वेळ काढण्याचा तिच्या विचार कधीच मागे पडला होता आणि उद्या सुद्धा असाच दिनक्रमामध्ये काहीतरी वेळ काढण्यात विचारांमध्ये विशाखाचा जीव गाढ झोपी गेला होता
