तिचा आदर
तिचा आदर
आज सहजच आरश्यात स्वतःकडे पाहिले. निरीक्षण केले आपलेच. आपण
मलाच माझ्यात दिसली ती जिजाऊ, सावित्रीबाई फुले, ती झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर....
अश्या अनेक क्रांतीकारी स्रियांचा अंश माझ्यातच आहे हे जाणवले.
पण! पण समाजाला, परिवाराला ती दिसली का? इतिहासातील स्त्रियांचे कर्तब ऐकवताना आपल्याच घरात जिजाऊ का नाही दिसत!
जी तुमच्या स्वराज्याचा वारसा जन्माला घालुन आजचा योग्य नागरिक घडवते. तुमचं स्वराज्य म्हणजे तिचा संसार....
हे राज्य सांभाळणारा शिवबाच घडवत असते ती.
त्याच्या सहवासातील प्रत्येक व्यक्ती मावळाच असतो. काही धोकेबाज तर काही प्रामाणिक!
शिकवण देत असते ती सतत...
का नाही दिसत घरातली सावित्रीबाई फुले...जी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आपल्याच माणसांशी संघर्ष करत असते.
त्यांच्या अपशब्दाचं शेण अंगावर घेत असते.आपल्या मुलींसाठी शिक्षणाच्या स्वातंत्राची दारे उघडण्यासाठी सतत धडपडत असते.
का नाही दिसत यांना झाशीची राणी जी इंग्रजांपेक्षा वाईट लोकांच्या नजरांपासुन तुमचं राज्य सुरक्षीत ठेवण्याचा प्रयत्न करत असते. इंग्रजांप्रमाणे क्षणीक सुखाचा लॉलीपॉप दाखवून तुम्हाला भ्रमित करणाऱ्या इंग्रजांच्या हाती आपले राज्य ती जिवंत असेपर्यंत जाऊ देत नाही.
मग ती आजची झाशीची राणी नाही का?
का नाही दिसत आजची अहिल्याबाई जी आपला नवरा गेल्यानंतर ही संसाररुपी राज्य एकटीच सांभाळते. कितीही वाईट परिस्थिती असो...इंग्रजासारख्या लोकांपासून आपलं राज्य सुरक्षीत ठेवण्याचा सतत प्रयत्नशील असते.
जिने आपलं पावित्र्य आणि राज्य (संसार)सांभाळला ती आजची अहिल्याबाई नाही का ?
दृष्टिकोन बदला आदराने पहा!
तुम्हाला जिजाऊ, सावित्रीबाई, झाशीची राणी, अहिल्याबाई अशा अनेक कर्तबगार स्त्रिया तुमच्या घरातच दिसतील. फक्त आदर केला पाहिजे
